रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी अविनाश कांबळे यांची अधिकृत निवड – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई दिनांक 3 : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांची निवड करण्यात आली.मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटी च्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या उपस्थितीत अविनाश कांबळे यांच्यावर रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा सरवदे; कार्याध्यक्ष बाबुराव कदम आणि राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी रिपब्लिकन पक्षाचे नवनियुक्त महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी च्या बैठकीत अविनाश कांबळी यांची राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड होताच राज्यभरातून आलेल्या रिपब्लिकन पक्षाचा पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी अविनाश कांबळे यांचे अभिनंदन केले.

अविनाश कांबळे हे मूळचे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असून केंद्र सरकार मध्ये उच्च अधिकारी पदावर कार्यरत होते. सरकारी कर्मचारी असताना त्यांनी बौद्ध धम्म चळवळीचे उल्लेखनीय काम राज्य आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर केले आहे. युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशन च्या माध्यमातून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर बौद्ध धम्म चळवळीचे काम करीत आहेत. अविनाश कांबळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्म चळवळीचा प्रसार प्रचार कामासोबत सामाजिक शैक्षणिक काम केले आहे.

मागील 40 वर्षांपासून ते केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या सोबत निष्ठावंत म्हणून काम करीत आहेत. अविनाश कांबळे हे आठवलेसाहेबांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी आहेत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा प्रसार केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले करीत आहेत. त्यामुळे ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाचे काम करण्याची ईच्छा अविनाश कांबळे यांनी व्यक्त केली. त्यानुसार ना.रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी अविनाश कांबळे यांची निवड करण्यात आली.

अविनाश कांबळे याच वर्षी केंद्र सरकार च्या सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर अविनाश कांबळे यांनी राजकीय पक्षात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांची रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी आज निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या आदेशाने रिपाइं चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या