भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार केंद्राच्या वतीने कॉम्रेड शाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार केंद्र यांच्या संयुक्त वतीने पुतळा पार्क मधील कॉम्रेड शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला कॉम्रेड प्रमोद मंडलिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून 105 व्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले यावेळी त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन त्यांना लाल सलाम करण्यात आला.
यावेळी कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले “सर्व महापुरुष हे समतेच्या-संघर्षाच्या पंढरीचे वारकरी आहेत, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अमर शेख, गव्हाणकर, क्रांतिसिंह नाना पाटील हे सर्व कष्टकरी दलित जनतेचे पुढारी आहेत, त्यांना विलग विलग वेगळे पाहता येणे शक्य नाही, मराठी अस्मिता प्रस्थापित व्यवस्था जगण्याचा प्रयत्न करीत असली तरी; मराठी भाषेचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड अमर शेख या शाहिरांनी आपल्या शाहीरीने अखंड महाराष्ट्र जागविला आहे. तेव्हा कोठे महाराष्ट्र जन्माला आला आहे, गरीब कष्टकऱ्यांचे हे महापुरुष भांडवली व्यवस्थेचे शोषणकारी नेते हायजॅक करत आहेत, दलित कष्टकरी वर्गाला या महापुरुषांच्या विचाराने प्रेरणा दिलेली आहे ही प्रेरणा घेऊन आपण पुढील काळातील अन्याय-शोषणाच्या विरोधात तीव्र संघर्षाला उभा राहू.”
यावेळी कॉ. प्रविण मस्तुद, अनिरुद्ध नखाते, बालाजी शितोळे, भारत भोसले, आनंद गुरव, आनंद धोत्रे, भारत चव्हाण, भारत पवार, सुरेश शितोळे आदी उपस्थित होते.




