मेघश्री गुंड हिस राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेचे बक्षीस वितरण

0

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहाय्यक आयुक्त मारुती फडके यांच्या हस्ते कुर्डूवाडी येथे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र स्वीकारताना मेघश्री गुंड व तिचे वडील आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड बाजूला इतर मान्यवर.

B1न्यूज मराठी नेटवर्क

माढा केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल झाला सन्मान

माढा : माढा तालुक्यातील शासकीय अधिकारी व नोकरदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यिनी मेघश्री राजेंद्रकुमार गुंड हिने महर्षी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने मार्च 2025 रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत माढा केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल तिला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहाय्यक आयुक्त मारुती फडके व प्रशासन अधिकारी शाहू सतपाल यांच्या हस्ते रविवारी 27 जुलै रोजी प्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन कुर्डूवाडी येथे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले.5000मेघश्री गुंड हिने भाषा व गणित विषयात 102 तर इंग्लिश व बुद्धिमत्ता विषयात 116 गुण पटकाविले आहेत.सध्या ती माढा येथील सीबीएसई बोर्डाच्या आर्या पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत आहे.तिला आई मेघना गुंड,सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, प्राथमिक शिक्षक सुधीर गुंड, वर्गशिक्षक संजय सोनवणे, गोरखनाथ शेगर, सुप्रिया ताकभाते, ऐजिनाथ उबाळे, भारत कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ती विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांची मुलगी आहे.

यावेळी उपविभागीय अभियंता पांडुरंग हांडे, अधिक्षक डॉ. सुनंदा रणदिवे, विस्ताराधिकारी सुषमा घाडगे, मुख्य प्रवर्तक विनोद कोळी, वाहतूक निरीक्षक मंगेश दहिहांडे, डॉ. प्रद्युम्न सातव, राजेंद्र गुंड, संतोष चव्हाण, संजय सोनवणे, दिनेश गुंड, समाधान कोकाटे यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या