निवडमहाराष्ट्रसोलापूर

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनियाजी गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या शिफारसीनुसार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य असलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये (उमेदवार छाननी समिती) नियुक्ती करून त्यांना आणखी एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर पक्ष नेतृत्वाने यापूर्वी कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्येही जबाबदारी सोपवली होती, ती त्यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने पार पाडली. तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीतही त्यांना वलसाड जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली असून तेथेही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

याच अनुभवाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्थापना केलेल्या स्क्रिनिंग कमिटीत (उमेदवार छाननी समिती) सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

सर्वजण मिळून बिहारमध्ये काँग्रेस पक्षाची संघटनात्मक जबाबदारी सक्षमपणे पार पाडून पक्षाच्या विजयासाठी नक्कीच प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button