निवडबार्शीमहाराष्ट्र

मांडेगावची कन्या पूनम मच्छिंद्र मिरगणे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील मांडेगावची कन्या पूनम मच्छिंद्र मिरगणे पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांची सहाय्यक निरीक्षक(API) पदी पदोन्नती करण्यात आली आहे. पुनम मिरगणे ह्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून मुंबई मध्ये दा.नौ. नगर पोलिस स्टेशन, जुहू पोलीस स्टेशन , सध्या अंधेरी पो स्टेशन अश्या मुंबईत नावाजलेल्या पो स्टेशन मध्ये सेवा केली आहे.5000या कार्यकाळात विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे निर्भया अधिकारी म्हणून बेस्ट nirbhaya अधिकारी पुरस्कार ips अधिकारी विश्वास नांगरे पाटील साहेब यांच्या हस्ते देण्यात आला. त्याचबरोबर अपहरण केलेल्या मुलाला कर्नाटक मधून शोधल्यामुळे बेस्ट तपास अधिकारी म्हणून गौरवण्यात आले.

शाळेत कॉलज मध्ये जाऊन पोलीस दिदी या कार्यक्रमांतर्गत मुलींना सक्षम बनवण्याचे काम करतात. त्याचबरोबर महिला व बालकल्याण अधिकारी म्हणून अनेक उपक्रम त्यांनी केले आहेत. यासाठी त्यांना विशेष पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले आहे.

सध्या त्या अंधेरी पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असून त्यांना सहाय्यक निरीक्षक(API) पदी पदोन्नती मिळाली आहे. या संदर्भातील पोलीस महासंचालकांनी आदेश जारी केला आहे. त्यांचे हे कार्य नवीन पिढीसाठी व विशेषता मुली व महिलांसाठी प्रेरणादायी आहे. पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र सर्व स्तरावरून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button