बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाला वेग द्याजिल्ह्यात एकही बालविवाह होऊ देऊ नका – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
बालविवाह निर्मुलन व बेटी बचाओ बेटी पढाओबाबतची जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन आणि बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची बैठक शुक्रवारी (दि. १८) जुलै रोजी पार पडली.
जिल्हा महिला बालविकास अधिकारी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जुलै २०२५ ते डिसेंबर २०२५ पर्यंत जिल्हयात विविध विषयावर जनजागृती करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, त्याची अंमलबजावणी करण्याकरीता विविध विभागांनी समन्वयाने कार्य करावे. त्यानुसार या विभागांनी आपले नियोजन करून दरमहा अहवाल सादर करावा, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले.
बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाला वेग द्यावा.
बालविवाहाच्या प्रत्येक प्रकरणात सर्व यंत्रणांनी सतर्क राहून बालविवाह प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणाव्यात. जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच मुलींचा जन्मदर उंचावण्याकरीता उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य विभागास देण्यात आले. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, महानगरपालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
सूत्रसंचलन एसबीसी/युनिसेफचे बाळू राठोड व सखी स्टॉप सेंटरच्या तेजस्विनी कांबळे यांनी केले. आभार चाईल्डहेल्पलाईनचे संदीप बेंडसुरे यांनी मानले.




