शहीद मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी बालग्राम पानगांव येथील शाळेत ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय बार्शी या संस्थेकडून वृक्षारोपण
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने शहीद मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी बहुउद्देशीय संस्था संचलित राधेश्याम भराडिया बालग्राम पानगाव येथील शाळेत दिनांक 20 जुलै 2025 रोजी वृक्षारोपण करण्यात आले त्यामध्ये नारळ, जास्वंती, चक्कु, आंबा, फुलांचे शोभेची रोपे आशा 51 रोपांची झाडे लावण्यात आली तेथील नियोजन संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर गोसावी, सचिव दत्तात्रय गोसावी, लक्ष्मण गोसावी, नागनाथ जाधव सर, प्रतीक कांबळे सर, अमर गोसावी सर, रामचंद्र काळे यांनी केले.
ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य केदारनाथ वळेकर यांनी सर्व झाडे दिली ध्यास कोचिंग क्लासेस संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सचिन मस्के सर यांच्या विद्यार्थ्यांनी ही यामध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये समर्थ जंगम श्रीराम देवकर वेदांत पवार तनवीर गडकर पानगाव शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी झाडे लावा झाडे जगवा एक पेड माँ के नाम असा नारा दिला. या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या अध्यक्ष राहुल वाणी यांनी केले.
सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. चंद्रकांत उलभगत सर यांनी केले. त्यावेळी राहुल वाणी, सुनील फल्ले, नागनाथ सोनवणे, संतोष शेळगावकर, माणकोजी ताकभाते, अजय तिवारी,सुरेंद्र जंगम, प्राध्यापक डॉ. चंद्रकांत उलभगत, ध्यास कोचिंग क्लासचे प्राध्यापक सचिन मस्के सर, सागर घंटे, सुनील नवले, केदारनाथ वळेकर, रेखा विधाते, रागिनी झेंडे, रेखा सरवदे, सुनिता गायकवाड यावेळी उपस्थित होते. संस्थेच्या आभार शिवशंकर गोसावी यांनी मानले. या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांनी सर्वांचे आभार मानले.




