जवाहर नवोदय विद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 29 जुलै 2025

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

भंडारा : ता. 14 नवोदय विद्यालय समितीकडून जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावीच्या प्रवेशाची सूचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार नवोदय विद्यालय समितीकडून शैक्षणिक वर्ष 2026व 2027 साठी निवड चाचणीद्वारे जवाहर नवोदय विद्यालय सहावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2025 आहे. आणि परीक्षा 13 डिसेंबर 2025 ला होणार आहे. या परीक्षेला बसण्यासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी येत्या 29 जुलै 2025 पर्यंत https://cbseitems.rcil.gov.nvs संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे ,लवकरात लवकर पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय, पाचगावचे प्रभारी प्राचार्य अजय अग्निहोत्री यांनी केले आहे.

राज्यातील नवोदय विद्यालयांमध्ये फक्त सहावीच्या वर्गात प्रवेश घेता येतो ,यासाठी इयत्ता पाचवीच्या वर्गात असतानाच या साठी निवड चाचणी परीक्षेला बसावे लागते या परीक्षेतील गुणाच्या आधारे अनुक्रमानुसार हे प्रवेश दिले जातात. या विद्यालयांमध्ये 2026 – 27 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाच्या निवड चाचणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्याना येत्या 29 जुलै 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवोदय विद्यालयाची स्थापना केली आहे. यानुसार केंद्र सरकारच्या वतीने नवोदय विद्यालय समिती स्थापन केलेली आहे .या स्वायत्त यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी निवासी जवाहर नवोदय विद्यालय सुरू केली आहे. या विद्यालयामधील विद्यार्थ्यांना दहावी व बारावी परीक्षेसाठी केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण मंडळ सीबीएससी बोर्ड असते.

भंडारा जिल्ह्यात पाचगाव वरठी तहसील मोहाडी येथे नवोदय विद्यालय आहे. जिल्हा निहाय जागा व आरक्षण प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी एक जवाहर नवोदय विद्यालय आहे .या प्रत्येक विद्यालयात प्रत्येकी 80 जागा असतात एकूण जागांपैकी किमान 75 टक्के जागा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. एकूण जागांपैकी मुलीसाठी किमान एक तृतीयांश जागा आरक्षित आहे.

ओबीसीच्या 27% दिव्यांगांना सरकारी नियमानुसार अनुसूचित जातीसाठी किमान 15 टक्के अनुसूचित जमातीसाठी किमान 7.5% जागा राखीव असतात.जवाहर नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळावर https://cbseitems.rcil.gov.nvs जाऊन ऍडमिशन प्रवेश हा पर्याय निवडावा, त्यानंतर या पर्यायाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य अजय अग्निहोत्री यांनी केले आहे.

निवड चाचणीसाठी पात्रता निकष इच्छुक विद्यार्थी ज्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात त्याला प्रवेश घ्यावयाच्या आहे, ज्या जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय कार्यरत आहे त्या जिल्ह्यातील प्रामाणित रहिवासी असावा. त्या जिल्ह्यातील मान्यताप्राप्त सरकारी निमसरकारी किंवा खाजगी शाळेत संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र 24 – 25 मध्ये इत्यादी पाचवी शिकत असला पाहिजे.

इच्छुक विद्यार्थी तिसरी, चौथी, पाचवी सलग उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जन्म 1 मे 2014 पूर्वी आणि 30 एप्रिल 2017 नंतर झालेला नसावा ग्रामीण भागाच्या आरक्षित कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांची तिसरी, चौथी व पाचवी ग्रामीण शाळेतून पूर्ण झालेली असावी जर विद्यार्थी तिसरी चौथी व पाचवी पैकी किमान एक दिवस जरी शाळेतून शिक्षण घेतलेले असेल तर तो अर्ज शहर भागातून आहे असे, समजले जाईल तृतीय पंथी उमेदवारांसाठी स्वतंत्र आरक्षण उपलब्ध नाही.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या