विकसित महाराष्ट्र 2047 मध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

0

जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या सर्वेक्षण मोहिमेत सहभागी व्हावे

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर, दिनांक 14 : विकसित भारत च्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार विकसित महाराष्ट्र 2047 साठी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करीत आहे. नागरिकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित होण्यासाठी नागरिक सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणाद्वारे, नागरिकांना सहभागी होण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्र 2047 च्या व्हिजनला आकार देण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.

या सर्वेक्षणात 7 सोपे प्रश्न विचारले आहेत. आपण ऑप्शन्स निवडू शकता, लिहू शकता आणि आवाज रेकॉर्ड करू शकता. तरी सर्वांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन आपल्या बहुमोल प्रतिक्रिया द्याव्यात तसेच आपल्या अधिनस्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना तसेच क्षेत्रीय कार्यालयातील सर्व संबंधिताना सहभागी होण्याबाबत सूचना द्याव्यात. तसेच आपल्या स्तरावरून या सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी आवश्यक प्रचार व प्रसिद्धी करून जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या