देश भांडवलदारी साम्राज्यवाद्यांच्या तरब्यात, हि हुकूमशाहीला सुरुवात – कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे
बार्शीत देशव्यापी संपा निमित्त झाली निदर्शने अंदोलन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आयटक कामगार केंद्राच्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघ, बांधकाम कामगार संघटना, अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचय संघटना, बार्शी नगरपालिका कंत्राटी कामगार संघटना बँक एम्प्लॉईज युनियन समन्वय समिती, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटना यांच्या संयुक्त वतीने दिनांक 9 जुलै 2025 रोजी देशव्यापी संपाचा भाग म्हणून तहसील कार्यालयासमोर तिव्र निदर्शने आंदोलने करण्यात आली. हे आंदोलन कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेचे संचलन कॉम्रेड ए. बी. कुलकर्णी यांनी केले.
यावेळी कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले; “कामगार शेतकरी यांना उद्वस्त करण्यासाठी सरकार कामाला लागले आहे. देशाने स्वातंत्र्य गमावून पुन्हा एकदा भांडवलदारी साम्राज्यवाद्यांच्या देश ताब्यामध्ये गेलेला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. बेरोजगारीने टोक गाठले आहे. सरकार व त्यांचे प्रशासनच स्वतः भ्रष्टाचारामध्ये बरबटून गेले आहे. देशात एक प्रकारे हुकूमशाही सुरू झाल्याचा हा प्राथमिक टप्पा आहे. हिटलरला ज्याप्रमाणे शेतकरी कामगारांनी बुटाखाली चिरडले त्याप्रमाणे पुढील काळात कष्टकरी कामगारांना संघर्ष करून हुकुमशाही वृत्तीला नेस्तनाबूत करण्यासाठी कामाला लागावे लागणार आहे.”
यावेळी खालील मागण्या करण्यात आल्या, महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक २०२४ तातडीने मागे घ्या, नवीन कामगार श्रम संहिता कायदा रद्द करा, कामगार कायद्यांची मोडतोड थांबवा, किमान वेतन तीन हजार करा, पिकाला किमान हमी भाव , स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, सरकारी नौकरी भरती करा , कामगार शेतकरी शेतमजुरांना १०,०००/- रु. पेन्शन द्या, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा, स्मार्ट मिटर लावणे बंद करा , ग्रामपंचायत कर्मचारी यांना सुधारीत वेतन श्रेणी व यावलकर समिती प्रमाणे वेतन द्या , बांधकाम कामगांचे नोंदणी नुतनीकरण, त्रुटीमध्ये दुरुस्ती ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करा, गमसेवक इंजिनीरांनी बांधकाम कामगारांच्या 90 दिवसांच्या प्रमापत्र द्या, बांधकाम कामगारांना हॉस्पीटलची सुविधा बार्शीत द्या , अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचरांना पुर्णवेळ म्हणून संबोधा व त्यांना 21 हजार वेतन द्या , बार्शी नगपालीका कामगारांना कामयसेवेत घ्या त्यांना किमान वेतन द्या, बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका मजबूत करा बँकांचे खाजगीकरण आणि एकत्रीकरण रद्द करा, .कंत्राटीकरण रद्द करा, जुनी पेन्शन सुरु करा, सामान्य ग्राहकांना सेवा शुल्क कमी करा, धनदांडग्या कर्जदारांकडून थकीत कर्जे वसूल करण्यासाठी कडक कायदे करा मेडिकल रिप्रेझेंटिव्ह यांच्या मागण्या सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज अॅक्ट 1976 (सेवा शर्ती) पुनर्रजिवित करा, वैद्यकीय प्रतिनिधींच्या सर्वसामान्य कामकाजाचे वैधानिक नियम तयार करा, जिवनावश्यक औषधांवरील जि.एस.टी. रद्द करा. , सर्व कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षेची हमी, स्थानिक पातळीवर लैंगिक छळ विरोधी तक्रार निवारण समिती करा, महिला पुरुषांना समान वेतन द्या, औषध विक्री उद्दिष्ट पूर्णतेसाठी मानसिक छळ करणे, बडतर्फी बंद करा , इलेक्ट्रॉनिक गॅझेट द्वारा ट्रॅकिंग व सर्व्हलन्स करुन वैयक्तिक गोपनियता व खाजगीपणावर अतिक्रमण बंद करा.
या आंदोलनात; कॉम्रेड तानाजी ठोंबरे, ए. बी. कुलकर्णी, सरिता कुलकर्णी, मनोज कुलकर्णी, युवराज घाडगे, लहू आगलावे, प्रविण मस्तुद, अनिरुद्ध नकाते, कॉ. लक्ष्मण घाडगे, कॉ. अमित काळदाते , कॉ. विशाल तांबडे बालाजी शितोळे, आनंद धोत्रे, आनंद गुरव, भारत भोसले, विशाल खलदे, अतुल क्षीरसागर, बाळासाहेब प्रताटे, महावीर कांगले, राजू ढेंबरे , नाना ठाकरे, अतुल ठाकरे , अण्णा ठाकरे , किरण शेंडगे, केशव गायकवाड, मयूर ननवरे, अक्षय मंडलिक आदी उपस्थित होते.




