रणवीर राऊत यांची राज्य परिषदेच्या सदस्य पदी निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने संघटनेच्या राज्य परिषदेवरील सदस्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन रणवीर राऊत यांची भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदेवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
रणवीर राऊत यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या राज्य परिषदेवर निवड झाल्यामुळे, बार्शी तालुक्यातील नागरिकांमध्ये, राऊत गटांमध्ये, तसेच सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रातून तसेच जनसामान्यातून रणवीर राऊत यांचे अभिनंदन होत आहे.




