दुखापत करुन जबरी चोरी करणारे जेरबंद गुन्हयातील 40,000/- रु किंमतीचे सोन्याचा मुद्देमाल हस्तगत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी तालुका पोलीस ठाणे हददीत दिनांक 30/ 7/2021 रोजी रात्री 8:30 वा.चे सुमारास यातील फिर्यादी, त्यांची पत्नी व मुलगी असे मोटार सायकलवरुन जात असताना ताडसौंदणे गावाचे पुढे कि.मी अंतरावर 4 अनोळखी आरोपीने त्यांना मारहाण करुन चाकुचा धाक दाखवून त्यांचे जवळील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने घेवुन गेले होते म्हणुन बार्शी तालुका पोलीस गु.र.नं.246/21 भादवि कलम 394,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वाढत्या चोरीच्या घटनामुळे मा.पोलीस अधिक्षक सो सोलापुर ग्रामीण यांनी सदर गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने मा. प्रभारी अधिकारी सपोनि जायपत्रे यांनी पोसई जाधव, पोहेकॉ/ सुभाष सुरवसे, पोहेकॉ/ राजेंद्र मंगरुळे ,पो.ना/अभय उंदरे, पो.ना/ अमोल माने, यांचे विशेष पथक नेमण्यात आले. मा. प्रभारी अधिकारी श्री जायपत्रे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीद्वारे यांनी आरोपी निष्पण्ण करुन आरोपी नामे प्रशांत ऊर्फसचिन बापु काळे ऊर्फ पवार वय 23 वर्षे रा.तेरखेडा ता. वाशी जिल्हा उस्मानाबाद यांचेवर वॉच ठेवनु सदर आरोपी हा तेरखेडा गावातील चौकात येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती. आरोपी प्रशांत ऊर्फसचिन बापु काळे ऊर्फ पवार यास दिनांक 26/10/2021 रोजी ताब्यात घेवून बार्शी पोलीस ठाणे येथे आणुन त्यास विश्वासात घेवुन तपास केला असता त्यांचे इतर तीन साथीदाराच्या मदतीने खालील गुन्हे उघडकीस आणले. बार्शी तालुका पोलीस ठाणे गु.र.नं 46/2021 भादवि कलम 394,34 मधील सोन्यो मणी मंगळसुत्र

व दोन कर्णफुले असा एकुण 40,000/- रु चा मुददेमाल जप्त केला आहे. 2 ) भुम पोलीस ठाणे गु.र.नं. 37/ 2021 मधील 395 मधील गुन्हयात वापरलेली मोटार सायकल 15000/- 6 किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वनी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, करमाळाउपविभागीय पोलीस अधिकारी श्री हिरे साहेब यांचे मार्गर्शनाखाली सपोनि / शिवाजी जायपत्रे, पोसई / प्रवीण जाधव, पोहेकॉ/ सुभाष सुरवसे, पोहेकॉ/राजेंद्र मंगरुळे, , पो.ना/ अमोल माने, पो.ना/ अभय उंदरे, पो. ना धनराज केकाण चापोकॉ/ वैभव भांगे, पो.कॉ/ रतन जाधव सायबर सेल यांनी गुन्हयाची कामगिरी बजावली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या