श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेच्या इयत्ता १० वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न…
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेच्या इयत्ता १० वी मध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास प्रकल्पांतर्गत संत तुकाराम सभागृह येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. व्यंकटेश भट साहेब सहसचिव उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय मुंबई तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. आशिष बारकुल उप विभागीय अधिकारी, उपविभाग सातारा हे होते.
प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष एन एन जगदाळे यांनी केले. तसेच कार्यक्रमातील अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी करून दिला. यानंतर प्रमुख पाहुणे आशिष बारकुल यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सर्वश्रेष्ठ विद्यार्थी घडवणे ही या संस्थेचे परंपरा आहे. विद्यार्थ्यांना प्रचंड कष्ट व मेहनत करावी लागेल मगच यश आपल्याला मिळेल असे त्यांनी मत व्यक्त केले.
सरकारी नोकरीस असलेल्या पैकी सर्वात जास्त संख्या ग्रामीण भागातील असून कोणत्याही क्षेत्रामध्ये ग्रामीण भाग मागे नाही असे सांगितले. यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव यांनी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांमधून चांगले मोठे अधिकारी घडतील अशी इच्छा व्यक्ती केली.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना व्यंकटेश भट म्हणाले प्रत्येक विद्यार्थ्यांनी मेहनत करावी.जर तुम्ही मेहनत केली तर यश तुमचंच असेल.तसेच विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे याबद्दलचचे मार्गदर्शन केले. चांगला आहार व मानसिक दृष्ट्या सक्षम बना असे त्यांनी सांगितले.
यानंतर इयत्ता दहावी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुणसंपादन करणाऱ्या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. सोबत संस्थेचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव,संस्थेचे उपाध्यक्ष एन एन जगदाळे, संस्थेचे सचिव पी टी पाटील यांनी संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, संस्था सदस्य सी एस मोरे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व्ही एस पाटील, संस्था सदस्य राजेंद्र पवार ,संस्था सदस्य बी के भालके महाराष्ट्र विद्यालयाच्या प्राचार्या के डी धावणे, उपमुख्याध्यापक आर बी सपताळे, पर्यवेक्षक एस.सी. महामुनी,पर्यवेक्षिका एन.बी. साठे, सर्व शिक्षक,सर्व पालक, सर्व विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कसबे व सुहासिनी शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्या के.डी.धावणे यांनी केले.




