महागाव येथे आयोजित पशुपक्षी प्रदर्शन व मेळाव्यास प्रतिसाद , प्रदर्शनात २५० हून अधिक पशुपक्ष्यांचा सहभाग

0

आमदार किसनराव वानखेडे यांच्या हस्ते उद्घाटन

यवतमाळ : महागाव येथील पंचायत समितीच्या प्रांगणात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तालुकास्तरीय पशु, पक्षी प्रदर्शन व पशु मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनात २५० हुन अधिक पशुपक्षी सहभागी झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार किसनराव वानखडे यांच्या हस्ते पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. विजय रहाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. क्रांती काटोले, तहसिलहार म्हस्के, गटविकास अधिकारी टाकरस तथा जिह्यातील सहायक आयुक्त पशुसंवर्धन डाॅ. अलोणे, डाॅ. नागापुरे, डाॅ. बावणे, डाॅ. कदम, डाॅ. डिडोळकर उपस्थित होते. प्रदर्शनाचे आयोजन पशुधन विकास अधिकारी डॉ. दिनेश पवार व डॉ. अमीत साहू यांनी केले होते.

सर्वप्रथम गोमाता पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रदर्शनामध्ये २५० हून अधिक विविध गटात संकरीत वासरे, देशी गायवर्ग, संकरीत गायवर्ग, सुदृढ बैलजोडी, म्हैसवर्ग, शेळी वर्ग, कुक्कुट वर्ग या प्रमाणे आठ गटात पशुपक्षी सहभागी झाले होते. या गटातील उत्कृष्ट पशुपक्ष्यांना आ. वानखेडे यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली.

एकूण २ लाख १८ हजार २०० रुपयांची ८० पारितोषिके देण्यात आली. पशु, पक्षी यांच्यासाठी टेंट, चारा, पाणी आदींची तर पशुपालकांसाठी जेवणाची व्यवस्था विभागाच्यावतीने करण्यात आली होती. प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले यांनी केले. संचलन नांदेडकर व शिंदे यांनी केले तर आभार डॉ. दिनेश पवार यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या