जिल्हाधिकारी विकास मीना यांनी स्वीकारला पदभार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

यवतमाळ : जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर शासनाने नव्याने नियुक्त केलेले जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज पदभार स्विकारला. प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला.

मीना हे 2018 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहे. येथे रुजु होण्यापुर्वी ते छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापुर्वी नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे प्रकल्प अधिकारी सोबतच उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.

मीना यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात अमरावती जिल्ह्यातून झाली. अमरावती येथे परिविक्षाधिन कालावधीत त्यांनी विविध पदांवर काम केले. आज जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्यासह प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या