वाहन मालकांना मोठा दिलासा! इतर जिल्ह्यातील वाहन धारकांनाही पुण्यात HSRP नंबर प्लेट बसवता येणार

B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत झालेल्या वाहनांसाठी एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट बंधनकारक केल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची संख्या वाढून वेळेअभावी एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी फिटमेंट सेंटरची संख्या वाढवली जाणार आहे. शिक्षण, नोकरी आणि उद्योग व्यवसायानिमित्त पुण्यात वास्तव्यास असलेल्या इतर जिल्ह्यांतील वाहनधारकांनाही आता पुण्यात याबाबतची सुविधा उपलब्ध असणार आहे.
परिवहन विभागाने वाहनधारकांना ३० एप्रिल २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. राज्यभरातील नागरिक पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांची वाहने इतर शहरांमध्ये नोंदणी केलेली असल्याने त्यांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) लावण्यास अडचणी येत होत्या. ही गैरसोय दूर करण्यासाठी पुण्यात सेंटर वाढविण्यात येणार आहेत.
वाहनधारकांनी यानुसार आता एचएसआरपी नोंदणी करताना पुणे सेंटर निवडून हा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या शहरांमध्ये नोंदणी असलेल्या आणि पुण्यात वापरत असलेल्यांना नंबर प्लेट लावण्यासाठी दिलासा मिळणार आहे.