महाराष्ट्ररायगड

आदिवासी युवकांच्या स्वप्नांना ड्रोनची भरारी AMRUT–TRTI करारामुळे आधुनिक तंत्रज्ञानातील करिअरची संधी खुली

B1न्यूज मराठी नेटवर्क350

रायगड-अलिबाग : आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील युवकांसाठी कौशल्यविकास आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या संस्थेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अमृत आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), पुणे यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे आता अनुसूचित जमाती (आदिवासी) प्रवर्गातील पात्र युवक-युवतींनाही अमृतच्या महत्त्वाकांक्षी ‘अमृत ड्रोन मिशन’ अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. या सहकार्यामुळे आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानातील कौशल्यप्रशिक्षणाचा लाभ अधिक व्यापक स्तरावर पोहोचणार असून, आदिवासी युवकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होणार आहेत.350
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या अमृतमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लक्षित गटातील पात्र युवक-युवतींसाठी ‘अमृत ड्रोन मिशन’ राबविण्यात येत आहे. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, सर्वेक्षण तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता, या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हा या मिशनचा प्रमुख उद्देश आहे. युवकांना दर्जेदार व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना सक्षम बनविण्याचा अमृतचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.

अमृतच्या पुढाकारामुळे आता या प्रशिक्षणाची संधी अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींपर्यंतही पोहोचणार आहे.350AMRUT–TRTI यांच्यातील सामंजस्य करारानुसार TRTI च्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनाही ‘अमृत ड्रोन मिशन’ अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाधारित कौशल्यप्रशिक्षणाच्या संधींपासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या आदिवासी तरुणाईलाही आधुनिक आणि वेगाने विकसित होणाऱ्या ड्रोन क्षेत्रात स्वतःचे करिअर घडविण्याची संधी मिळणार आहे.

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना ड्रोन तंत्रज्ञानाचे परिपूर्ण ज्ञान, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः शेतीमध्ये फवारणी, पीक निरीक्षण, जमिनीचे सर्वेक्षण, मॅपिंग आणि विविध तांत्रिक सेवांसाठी ड्रोनचा वापर वाढत असल्याने प्रशिक्षित ड्रोन पायलट्ससाठी रोजगाराच्या अनेक शक्यता निर्माण होत आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर युवकांना नोकरीच्या संधींबरोबरच स्वतःचा ड्रोन सेवा व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधण्याचीही दिशा मिळू शकते.350अमृत आणि TRTI यांच्यातील हे सहकार्य केवळ प्रशिक्षणाच्या संधींचा विस्तार करणारे नसून, आदिवासी युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणारे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कौशल्यविकास, तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन या माध्यमातून युवकांच्या प्रगतीला चालना देण्याचा अमृतचा प्रयत्न या उपक्रमातून अधिक व्यापक होणार आहे.

इच्छुक पात्र उमेदवारांना TRTI चे आवाहन!

अनुसूचित जमाती प्रवर्गातील इच्छुक व पात्र युवक-युवतींनी ‘अमृत ड्रोन मिशन’ अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणाच्या या संधीचा लाभ घ्यावा आणि प्रशिक्षणासाठी लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन TRTI तर्फे श्री. निलेश सागर यांनी केलेले आहे. प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित असल्याने पात्र उमेदवारांनी विलंब न करता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

अधिक माहिती व अर्जासाठी संकेतस्थळ : www.amrutdronemission.com

350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button