महाराष्ट्रमुंबई

शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना मालकी हक्कामुळे पुनर्विकासाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी निवारा परिषदेअंतर्गत गृहनिर्माण संस्थांना वर्ग-1 रूपांतरण आदेशांचे वितरण

B1न्यूज मराठी नेटवर्क350

मुंबई, दि. २७ : मुंबईतील शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना वार्षिक बाजारमूल्य दरपत्रकाच्या (रेडी रेकनर) केवळ पाच टक्के अधिमूल्याने भोगवटादार वर्ग-1 दर्जा देऊन मालकी हक्क देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे संस्थांचा पुनर्विकास आणि स्वयं-पुनर्विकास सुलभ होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वांद्रे येथील उत्तर भारतीय संघ सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नागरी निवारा परिषदेअंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वर्ग-1 रूपांतरण आदेश वितरित करण्यात आले. सुमारे 62 एकरांवरील या वसाहतीत 113 सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील 6 हजार 250 सदनिका आणि 25 हजार रहिवाशांना याचा लाभ मिळणार आहे. यामुळे या सदस्यांना मालकी हक्क मिळून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.350मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने 2017-18 मध्ये कायद्यात बदल करून भाडेपट्ट्यावरील जमिनी वर्ग-1 करण्याची व्यवस्था निर्माण केली. सुरुवातीला 25 टक्के आणि त्यानंतर 10 टक्के अधिमूल्य आकारण्यात येत होते. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाची गरज लक्षात घेऊन पाच टक्के अधिमूल्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने एकमताने मान्य केला. अधिमूल्य कमी केल्यामुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना लाभ होईल. राज्य शासनाने स्वयं-पुनर्विकासासाठी विविध सवलती दिल्यामुळे मुंबईत सुमारे 1 हजार 600 प्रस्ताव पुढे आले असून शासनाने त्यासाठी विविध सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुंबईतील शासकीय जमिनीवरील अन्य सहकारी गृहनिर्माण संस्थांनाही वर्ग-1 रूपांतरणाचा लाभ देण्यासाठी महसूल विभागाने व्यापक मोहीम राबवावी, संस्थांच्या परिसरात शिबिरे घेऊन नागरिकांना आवश्यक मदत करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

उंच इमारती आणि टॉवरमधील प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र मालमत्ता पत्रक देण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे मालकी हक्क अधिक स्पष्ट होऊन एकच सदनिका एकापेक्षा अधिक व्यक्तींना विकण्यासारख्या गैरप्रकारांना आळा बसेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुंबईतील मराठी माणूस मुंबईतच राहिला पाहिजे, सर्वसामान्यांना उत्तम जीवनमान मिळाले पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.350तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असून वांद्रे परिसरात ‘सक्षम’ योजनेअंतर्गत कौशल्य गणना करण्याच्या अभिनव उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या माध्यमातून तरुणांना रोजगार देणाऱ्यांसोबत जोडून देण्याचे महत्त्वपूर्ण काम होत असल्याचे त्यांनी सांगितले. रोजगार बाजारपेठेच्या गरजेनुसार युवकांना प्रशिक्षण आणि कौशल्यवृद्धीची संधी देणारे हे प्रारूप राज्यातील अन्य भागांतही राबविता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दादासाहेब फाळके चित्रनगरीसाठी मानखुर्द येथील जागा देण्यात येत आहे. या जागेमध्ये मराठी चित्रपटांना सवलत द्यावी अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांना केली. त्याचप्रमाणे ड्रग्ज फ्री मुंबई करण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतलेल्या पुढाकाराचा उल्लेख करुन आपण एकत्रित प्रयत्नांतून ‘ड्रग्ज’ला पराभूत करू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेनुसार मुंबईतील नागरिकांच्या घरांना कायदेशीर आणि शाश्वत मालकी हक्क देण्यासाठी शासनाने नियम अधिक सुलभ केले आहेत. पाच टक्के अधिमूल्याच्या निर्णयामुळे नागरी निवारा परिषदेतील कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होऊन त्यांच्या घरांच्या पुनर्विकासाला चालना मिळेल. मुंबईतील पात्र गृहनिर्माण संस्थांपर्यंत ही मोहीम व्यापक स्वरूपात पोहोचविण्यात येईल, असे सांगून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची घरे कायदेशीर करून त्यांची मालमत्ता शाश्वत करण्यासाठी महसूल, सहकार आणि नगरविकास विभाग समन्वयाने काम करीत असल्याचे ते म्हणाले.350सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नागरी निवारा परिषदेतील संस्थांना वर्ग-1 दर्जा मिळणे हा मुंबईच्या सामाजिक इतिहासातील महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे सांगितले. वांद्रे-सांताक्रूझ परिसरात राबविलेल्या ‘सक्षम’ कौशल्य गणनेत सुमारे 31 हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून 3500 युवकांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमात मानखुर्द येथे अतिक्रमणमुक्त केलेली 14 एकर शासकीय जमीन चित्रनगरीच्या विकासासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आली. मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने विशेष मोहिमेद्वारे आतापर्यंत सुमारे 60 एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त केली असून या जमिनींचा सार्वजनिक प्रकल्प आणि शासकीय कामांसाठी उपयोग करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रशासनाच्या सांघिक प्रयत्नांमुळे रूपांतरणाचे आदेश, अतिक्रमणमुक्ती आणि नागरिकाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबविता आल्याचे त्यांनी नमूद केले.350जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रास्ताविकाद्वारे नागरी निवारा परिषदेअंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वर्ग-1 रूपांतरण, चित्रनगरीसाठी देण्यात येणारी जागा, ड्रग्ज फ्री मुंबई कार्यक्रम, तसेच ‘सक्षम’ कौशल्य जनगणना व उपजीविका याबाबत माहिती दिली. आता पर्यंत ६० एकर जागा अतिक्रमण मुक्त केली जिल्हाधिकारी यांनी या पैकी १४ एकर जागा film city ला प्रदान करण्यात आली आहे. नागरी निवारा मधे ६२ एकर जागा असून ११३ सहकारी गृह निर्माण संस्था मधे ६२५० सदनिका धारक असून २५००० पेक्षा जास्त नागरिक राहत आहेत त्याचा घराचा प्रश्न मार्गी लागला आहे. ⁠कौशल्य विकास अभियान मधे ३१,५६९ उमेदवारांना करिअर मार्गदर्शन देवून ३४४९ युवकाना रोजगार संधी उपलब्ध केली त्या पैकी ११२८ उमेदवारांनी नोकरी स्वीकारली आहे. ⁠ कौशल्य सर्व्हे चे हे मॉडेल अनेक जिल्ह्यांनी स्वीकारले आहे. मुंबईतील विविध शाळा व कॉलेजमध्ये आतापर्यत 3108 समपुदेशन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या अभियानात विविध NGOs च्या सहभागातून 538 समुपदेशक (Councilor) कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून आतापर्यत 330 समुपदेशन सत्रांचे (Session) यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार रवींद्र वायकर, आमदार प्रवीण दरेकर, सुनील प्रभू, मुरजी पटेल, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, नागरी निवारा अंतर्गत गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button