महाराष्ट्ररायगड

दरडग्रस्त कुटुंबांना हक्काची घरे देण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा स्थानिकांच्या गरजांनुसार दर्जेदार घरांची उभारणी करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाड व पोलादपूर तालुक्यातील बाधित गावांच्या पुनर्वसनाचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

B1न्यूज मराठी नेटवर्क350

रायगड-अलिबाग : महाड व पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांमधील घरांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक असून अनेक वर्षांपासून घरांपासून वंचित असलेल्या बाधित कुटुंबांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही युद्धपातळीवर करावी. पारमाची येथील १९८ घरांची उभारणी तातडीने सुरू करून स्थानिकांच्या गरजांनुसार चांगल्या दर्जाची घरे बांधावीत, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दरडग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन ही शासनाची जबाबदारी असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.350महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात महाड व पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांतील घरांच्या प्रश्नांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री भरत गोगावले, खासदार ज्योती वाघमारे, जिल्हा परिषदेचे सभापती चंद्रकांत कळंबे, नगराध्यक्ष सुनील कविस्कर, विकास गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.350उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, घर हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. दरड कोसळल्यामुळे अनेकांची घरे आणि कुटुंबातील माणसे गमावली आहेत. पारमाची येथील १९८ घरांच्या उभारणीसाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी. संबंधित यंत्रणांनी उपलब्ध यंत्रणा घटनास्थळीच ठेवून घरांचे बांधकाम सुरू करण्याचे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

घरे बांधताना केवळ फ्लॅट पद्धतीची घरे न बांधता स्थानिकांच्या जीवनशैलीला अनुरूप, चांगल्या दर्जाची आणि चांगल्या प्रतीची घरे उभारावीत. बांधकाम सुरू झाल्यानंतर आपण स्वतः पाहणीसाठी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तळीये येथील उर्वरित घरांच्या प्रश्नाबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.350ते पुढे म्हणाले, दरडग्रस्त नागरिकांना हक्काचे घर मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. रोटी, कपडा आणि मकान उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेतून शासन काम करीत असून, गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना न्याय मिळवून दिला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नागरिकांच्या हिताची कामे करताना कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री भरत गोगावले म्हणाले, सन १९९६ पासून दरड कोसळणे, अतिवृष्टी व अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे या भागातील अनेक घरे बाधित झाली आहेत. या कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार पुरेशी घरे उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. बैठकीस संबंधित गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button