बार्शीमहाराष्ट्रशिबीर

रेकॉर्ड ब्रेक रक्तदान! ६७२ रक्तपिशव्यांचे संकलन : बार्शी तालुक्यात रक्तदानाचा नवा विक्रम! २६/११ च्या शहीद वीरांना रक्तदानातून अनोखी श्रद्धांजली!

B1न्यूज मराठी नेटवर्क350

बार्शी : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि निष्पाप नागरिकांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी बार्शी पोलिसांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या शिबिरात तब्बल ६७२ रक्तपिशव्यांचे संकलन झाले आणि बार्शी तालुक्याने रक्तदानाचा नवा विक्रम प्रस्थापित केला. या शिबिरात नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील, विद्यार्थी, पोलीस भरती व आर्मी भरतीचा सराव करणारे युवक तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.350 पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गणेश कुंभार, बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे आणि पांगरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील धनवे यांनी विशेष परिश्रम घेतले.350रक्तदान हे केवळ रक्त देणे नाही, तर एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणे आहे. शहीद वीरांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा हा संकल्प खऱ्या अर्थाने मानवतेचा उत्सव ठरला. बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी शिबिर सुरू झाल्यापासून सांगता होईपर्यंत स्वतः उपस्थित राहून रक्तदात्यांचे स्वागत केले. रक्तदानासाठी पुढे आलेल्या प्रत्येक रक्तदात्याचे व नागरिकाचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button