निवडणूकमहाराष्ट्रसोलापूर

जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व; १९ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय!

मोहिते-पाटील यांना माळशिरसपुरते यश; अर्जुनसिंह मोहिते-पाटील विजयी, तर मनीष देशमुख यांनी अवघ्या २८ मतांनी मारली बाजी

B1न्यूज मराठी नेटवर्क350

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे. एकूण १९ जागांपैकी तब्बल १८ जागांवर विजय मिळवत या पॅनलने जिल्हा बँकेवरील आपली पकड मजबूत केली आहे. दुसरीकडे, मोहिते-पाटील यांच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला माळशिरस मतदारसंघात समाधान मानावे लागले. या मतदारसंघातून अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी विजय मिळवत आपला गड कायम राखला.

या निवडणुकीत भाजपप्रणित सहकार विकास पॅनल आणि मोहिते-पाटील यांच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, निवडणुकीच्या निकालात सहकार विकास पॅनलने एकतर्फी बाजी मारत १९ पैकी १८ जागांवर आपले उमेदवार निवडून आणले. या निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत बँकिंग व पतसंस्था मतदारसंघात झाली. या मतदारसंघात मनीष देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचा अवघ्या २८ मतांनी पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते.350

सहकार विकास पॅनलचे बिनविरोध विजयी उमेदवार :

१. राजेंद्र राऊत – बार्शी विकास सोसायटी
२. प्रशांत परिचारक – पंढरपूर विकास सोसायटी
३. विक्रांत (बाळराजे) पाटील – मोहोळ विकास सोसायटी
४. सिद्धेश्वर आवताडे – मंगळवेढा विकास सोसायटी
५. यशराज शिंदे – माढा विकास सोसायटी
६. श्रीदीप हसापुरे – दक्षिण सोलापूर विकास सोसायटी
७. पृथ्वीराज माने – उत्तर सोलापूर विकास सोसायटी
८. शंभूराजे जगताप – करमाळा विकास सोसायटी
९. सचिन कल्याणशेट्टी – अक्कलकोट विकास सोसायटी
१०. अजिंक्यराणा पाटील – ओबीसी मतदारसंघ
निवडणुकीत विजयी झालेले सहकार विकास पॅनलचे उमेदवार :
१. बाबासाहेब देशमुख – सांगोला विकास सोसायटी
२. अर्चना घाडगे – महिला मतदारसंघ
३. शामल बागल – महिला मतदारसंघ
४. राजेंद्र बंदीछोडे – इतर भटक्या जमाती
५. रणजितसिंह शिंदे – कृषी व प्रक्रिया
६. मनीष देशमुख – बँक व पतसंस्था
७. सूर्यादित्य साळुंखे – दुग्ध विकास
८. महादेव कांबळे – अनुसूचित जाती

स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचा विजयी उमेदवार :
१. अर्जुनसिंह मोहिते-पाटील – माळशिरस विकास सोसायटी

या निकालामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. १९ पैकी १८ जागांवर मिळवलेला विजय हा या पॅनलसाठी मोठे राजकीय यश मानले जात आहे. तर माळशिरसची जागा जिंकत मोहिते-पाटील यांनी आपले सहकार क्षेत्रातील प्रतिनिधित्व कायम ठेवले आहे.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button