केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून निदर्शने आंदोलन.
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अवमान केल्या विरोधात तसेच परभणी येथील संविधान शिल्पाची मोडतोड व सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याच्या विरोधात तीव्र निदर्शने आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पक्ष , आयटक कामगार केंद्र व दलित अधिकारांदोलन यांच्या संयुक्त व त्यांनी दिनांक 25 डिसेंबर 2024 वार बुधवार रोजी जुना गांधी पुतळा चौकात करण्यात आले. यावेळी रस्त्यावर कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा हातात घेत निषेधाच्या घोषणा देऊन परिसर जाणून सोडला.
यावेळी कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे म्हणाले “मनुस्मृतीवर प्रेम करणारी भाजप सत्तेवर बसल्यापासून त्यांच्या मनातील खदखद अमित शहांनी ओकली आहे. दलित श्रमिक वर्गाच्या विरोधात काम करण्याची त्यांची धोरण व वृत्ती आहे. दलित कष्टकऱ्यांच्या विरोधात कायदे करून संविधानावर मोडतोड सुरू आहे, यामागील मेंदू हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरलेला आहे. दलित-श्रमिक वर्ग संविधानावरील व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील हल्ला कधीही खपवून घेणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा.” अशी त्यांनी मागणी केली.
यावेळी कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे, कॉ. प्रविण मस्तुद, लहू आगलावे, भारत भोसले , आनंद गुरव, भारती मस्तुद, सुनील जावळी , बब्रुवान अय्यर, धनाजी पवार, अनिरुद्ध नखाते, लक्ष्मण घाडगे, बालाजी शितोळे, विनोद गायकवाड, भारत चव्हाण , प्रमोद मंडलिक आदी उपस्थित होते.