घाटे प्रशालेचे कर्मचारी मुलाणी यांना कृतिशील कर्मचारी पुरस्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील यावली येथील श्री बळवंतराव घाटे प्रशालेचे शिक्षकेतर कर्मचारी इलाई बकसू मुलानी यांना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने कृतिशील शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार देण्यात आला.
इलाई मुलानी हे श्री बळवंतराव घाटे प्रशाला यावली येथे कार्यरत असून सर्व विद्यार्थी शिक्षक यांना प्रिय आहेत, प्रशालेच्या प्रत्येक उपक्रमात नेहमी हिरीरीने सहभागी होऊन ते गावातील सामाजिक उपक्रमात पण सहभागी असतात त्यांना शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह बार्शी येथे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, माजी नगरसेवक अरुण बारबोले तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
त्यांना मिळालेले या पुरस्काराबद्दल संस्थेचे आश्रयदाते गिरीष घाटे, संचालक व स्कुल कमिटी अध्यक्ष श्रीहरी चव्हाण सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक चव्हाण सर, सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच गावकर्यांनी अभिनंदन केले.