परभणीतील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या व्यक्तिवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यामागील मास्टरमाईंडचा शोध घ्या- अॅड. विवेक गजशिव
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या व्यक्तिवर देशद्रोहाचा गुन्हा व कठोर कारवाई करून या घटनेमागे असलेल्या खऱ्या मास्टरमाईंडचा शोध घेण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड.विवेक गजशिव यांनी तहसीलदार एफ.आर.शेख यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
पुढे तहसीलदार एफ.आर.शेख यांना दिलेल्या निवेदनात अॅड.गजशिव यांनी यामागील खऱ्या सूत्रधाराचा शोध घ्या व संबंधित विटंबना करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करा. महाराष्ट्रातील सर्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळे असणाऱ्या ठिकाणी सुरक्षा वाढवा, असे प्रकार आम्ही यापुढे खपवून घेणार नाहीत असा इशारा देखील यावेळी दिला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष अॅड.विवेक गजशिव,रोहित बोकेफोडे, तालुका उपाध्यक्ष भैरवनाथ शिंदे, स्वप्निल लंकेश्वर, तालुका महासचिव शशिकांत पाचकुडवे, सूरज भालशंकर, अॅड. स्वप्निल खंडागळे, अॅड. जगदीश दगडे, अॅड. कपिल भोसले, अॅड. शुभांगी गायकवाड, वामन आहिरे, मोहसीन तांबोळी, निलेश मस्के, अरबाज शेख, इब्राहिम शेख, निलेश शिंदे, गणेश वाघमारे, आनंद ननवरे, लक्ष्मण पालके, अश्वकुमार अहिरे आदी उपस्थित होते.