जातीच्या पलीकडे जाऊन बार्शीच्या महासंघाचे कार्य कौतुकास्पद आहे – डॉ. मच्छिंद्र सकटे
दलित महासंघाचा पुरस्कार वितरण दिमाखात
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : धामणगावच्या माणकोजी महाराज बोधले यांच्या उच्च कुळात जन्म घेतला, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तशीच गोष्ट आज दलित महासंघाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यावर झाली आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी कीर्तनातून सेवा करीत आहे त्यासाठी कृतार्थ झालो, अशी भावना ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी व्यक्त केली.
दलित दलित दलित महासंघाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय दलित मित्र गौरव पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर आ. राजेंद्र राऊत, दलीत महासंघाचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे, आ. राजेंद्र राऊत, तहसीलदार एफ. आर. शेख, अप्पर तहसीलदार वृषाली केसकर, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. काकासाहेब गुंड, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ विचार मंचचे अध्यक्ष श्रीधर कांबळे, बांधकाम समितीचे माजी सभापती ज्योतिर्लिंग कसबे, रिपाईचे अण्णासाहेब लोंढे, उद्योजक शशांक गुगळे, भिम टायगर संघटनेचे शंकर वाघमारे,आदी उपस्थित होते.
यावेळी बोधले महाराज म्हणाले, ज्याप्रमाणे संतांनी समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा संदेश दिला. त्याच पद्धतीने येथील दलित महासंघ कार्य करीत आहे. दलित आणि इतर समाजामध्ये समन्वय साधण्याचे मोठे काम दलित महासंघ करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे म्हणाले, बार्शीत सामाजिक बांधिलकी जपणारी माणसे खूप आहेत. म्हणूनच मागील १६ वर्षापासून दिवसेंदिवस या पुरस्काराची उंची वाढत आहे, असे सांगितले. जातीच्या पलीकडे जाऊन बार्शीच्या महासंघाचे कार्य कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले.
आ. राऊत म्हणाले, सध्या सर्व जाती-धर्मांनी एकत्र राहण्याचे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचा वादविवाद न करता समाजात एकसंधपणे वागणे देशासाठी महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केले. विकास कामांमध्ये बार्शी नेहमीच अग्रेसर राहिली असून यापुढे देखील या सभागृहासारखे आणखी एक सभागृह आपण उभा करू, असे आश्वासन देखील आमदार राऊत यांनी यावेळी दिले.
श्रीधर कांबळे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक सुनील अवघडे यांनी केले.. सूत्रसंचालन नीता देव यांनी तर आभार शहराध्यक्ष संदीप आलाट यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा उपाध्यक्ष निलेश खुडे, तालुकाध्यक्ष संगीतराव शिंदे, माढा तालुका अध्यक्ष बाळासाहेब देवकुळे, संतोष बगाडे, अमृत आलाट, सत्यजित खलसे,सचिन क्षीरसागर, महादेव भिसे, युवराज शिंदे, अमोल कांबळे, हरिश्चंद्र कांबळे, चाणक्य आलाट, विधान आलाट, सारंग अवघडे, सुनील कांबळे, राम नवले यांनी परिश्रम घेतले.
पुरस्कार मिळालेले मान्यवर :
जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कीर्तनकार जयवंत बोधले महाराज यांना प्रदान करण्यात आला तर
तहसीलदार एफ. आर. शेख, डॉ. अजित आव्हाड, सौ. कविता मोहिते, शिवशक्ती बँकेचे संचालक राजेंद्र मोरे, उद्योजक नितीन देशमुख, जिजाऊ गुरुकुलचे संभाजी घाडगे, माऊली उद्योग समूहाचे अमृत राऊत, विक्रम सावळे, उडान फाउंडेश नसामाजिक संघटना, विजय साळुंखे, ऍड. अविनाश गायकवाड, किरण तौर, विजय निलाखे, श्याम थोरात, ऍड. अमोल अलाट, रवीनंद मोहिते, आनंद कांबळे, नीता देव, यांच्यासह दहावी आणि बारावीमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या समर्थ नेटके, प्रगती नेटके, प्रतीक्षा चव्हाण, ओंकार नेटके, प्रिया अवघडे, सुरभी कसबे यांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.