जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शिवाजी चिकणे यांची निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी तालुका स्तरीय शालांतर्गत क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात , त्या मध्ये कुस्ती या खेळामध्ये अतुलनीय असी कुस्ती मध्ये प्राविण्य मिळविल्याने पैलवान शिवाजी सूर्यकांत चिकणे यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. भैरवनाथ माध्यमिक विद्यालय गुळपोळी चा विद्यार्थी तथा पैलवान शिवाजी सूर्यकांत चिकणे या विद्यार्थी याने कुस्ती या खेळामध्ये सहभाग घेतला होता याची निवड जिल्ह्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पैलवान शिवाजी सूर्यकांत चिकणे यांची आंतर शालेय क्रीडा स्पर्धेत, कुस्ती या खेळातून जिल्ह्यास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने सर्वानी अभिनंदन केले.
पैलवान कुस्ती सम्राट अस्लम काझी यांनी विशेष मार्गदर्शन केले व भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद देशमुख , संतोषकुमार चिकणे शिक्षक,व सत्यवान माळी यांनी पैलवान शिवाजी चिकणे यांना कुस्ती शिकविण्यासाठी परीश्रम घेतले, आहाराची काळजी आई सौ. रेखा सूर्यकांत चिकणे यांनी घेतली ,व शिक्षक, नातेवाईक व तालुक्यातील सर्वांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.