बार्शी तालुक्यातील सर्व पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी : सूर्यकांत चिकणे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील सर्व मंडलातिल सर्व पिके सततच्या पावसामुळे पिवळी पडली आहेत,आठ दिवसात पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी, एन डी आर एफ किंवा एस डि डि आर एफ मधून तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी गुळपोळी गावातील एसटी स्टँडवर सूर्यकांत चिकणे यांचे नेतृत्वखाली दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बार्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी भैरवनाथ शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चिकणे यांनी केली आहे,आठ दिवसात पंचनामे करून मदत न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे उपोषण करणार असा इशारा सूर्यकांत चिकणे यांनी दिला आहे.

बार्शी तालुक्यात सतत पाऊस पडत आहे सततच्या पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे व सर्व पिके पाण्यात गेली आहेत व द्राक्षे बागेला काडयांना मुळ्या आल्या आहेत, द्राक्षे बागेला मुळ्या आल्याने फळ धारणा होत नाही व सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे म्हणून बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून ,शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी असे रास्ता रोको आंदोलन करताना जनहित शेतकरी संघटनेचे तालुका संघटक रविंद्र मुठाळ खामगाव व शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते रामराव आपपाराव काटे पाटील यांनी तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली आहे, सरकार शेतकऱ्यांना मदत देताना हात आखडता घेत आहे असे आरोप शिंदे सरकारवर रामराव पाटील यांनी आरोप केले आहेत.

सदरच्या मागण्याचे निवेदन प्रभारी मंडल अधिकारी शिंदे व कृषी सहायक जगदाळे यांनी स्विकारले सदर आंदोलनात खामगाव, गुळपोळी, मालवंडी सुर्डी येथील खालील प्रमाणे शेतकरी उपस्थित होते, सूर्यकांत चिकणे, रामराव पाटील, रविंद्र मुठाळ, शहाजी चिकणे, परशुराम दाजी पाटील, कृष्णाथ भिमराव चिकणे, विशाल विठ्ठल चिकणे, गोपाळ काळे, दत्तात्रय महादेव गुरव, अशोक गंगाराम चिकणे, चांद शेख,ईलाई शेख, प्रशांत गणेश चिकणे, रामचंद्र हनुमंत चिकणे, अर्जून शिंदे, श्रीकांत विजय चिकणे, सौरभ नागनाथ कापसे, प्रमोद रविंद्र गायकवाड,अतुल सूर्यकांत चिकणे, अक्षय सावंत, आकाश चिकणे,सचिन पाडूळे, दिलीप लक्ष्मण चिकणे नानासाहेब फोके, परमेश्वर पांडुरंग चिकणे यांचेसह दिडशेहून अधिक शेतकरी रास्ता रोको आंदोलनास उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या