निवडणूक निरीक्षक (सामान्य) कृष्णकुमार निराला यांची नियुक्ती

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

परभणी : भारत निवडणूक आयोगाने 17 – परभणी लोकसभा मतदार संघासाठी गुजरात केडरचे कृष्णकुमार निराला (भा.प्र.से.) यांची निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचे बुधवारी सायंकाळी परभणी येथे आगमन झाले आहे. मतदार किंवा राजकीय पक्ष, उमेदवार यांना निवडणूक निरिक्षक निराला यांच्याशी संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8483058717 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

निवडणूक कालावधीत निराला यांचा मुक्काम सावली शासकीय विश्रामगृह, वसमत रोड, परभणी, येथे असणार आहे. विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाले, भ्रमणध्वनी क्रमांक 94238 61363 यांची निवडणुक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हा निवडणूक यंत्रणेने कळविले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या