सुयश विद्यालय बार्शीचे मॅथ्स ओलंपियाड मध्ये तब्बल 47 तर सायन्स ओलंपियाडचे तब्बल 27 विद्यार्थी गोल्ड मेडल धारक
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सायन्स ओलंपियाड फाउंडेशन द्वारे आयोजित केली जाणारी मॅथ्स ओलंपियाड परीक्षेमध्ये सुयश विद्यालयाचे इयत्ता चौथी ते इयत्ता दहावीचे विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते. यामध्ये इयत्ता चौथी ते दहावीपर्यंत तब्बल 47 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवलेले आहे. यामध्ये 21 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल ऑफ डिस्टिंक्शन तर 26 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल ऑफ एक्सलेन्स मिळविले आहेत. सायन्स ओलंपियाड मध्ये 27 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल आॕफ एक्सलन्स प्राप्त केले आहे.मॅथ्स व सायन्स ओलंपियाड एक्झाम ही भविष्यामध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी एक्झाम असते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना गणित विषयासाठी नलवडे मॅडम, गायकवाड मॅडम माने मॅडम, सुरवसे मॅडम तोडकरी मॅडम व गुंड सर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते. तर सायन्स या विषयासाठी राखुंडे मॅडम लोंढे मॅडम मोरे मॅडम व जठार मॅडम यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक नलवडे साहेब संस्थेच्या मार्गदर्शिका प्रतिभा नलवडे मॅडम प्रशालेचे मुख्याध्यापक मंडलिक सर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.