जेष्ठ पत्रकार अरुण बळप यांचा भारत विकास परिषदेच्या वतीने सेवा पुरस्काराने गौरव

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : अनेक वर्षांपासून पत्रकारितेमध्ये आपल्या लेखणीतून सोलापूर जिल्ह्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याने ठसा उमटवणारे, दैनिक तरुण भारतचे बार्शी प्रतिनिधी पत्रकार अरुण बळप यांचा भारत विकास परिषदेच्या वतीने सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
भारत विकास परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील सेवा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. खिळे जुळणीच्या पत्रकारितेपासून आत्ताच्या डिजिटल पत्रकारतेपर्यंत, पत्रकारिता क्षेत्रातील तीन दशकांच्या निर्भीड, निस्वार्थी, निपक्षपाती आणि परखड अशा उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार अरुण बळप यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पत्रकार अरुण बळप यांना मिळालेल्या सेवा पुरस्काराबद्दल पत्रकारिता आणि विविध क्षेत्रातून त्यांच्यावरती अभिनंदनचा वर्षा होत आहे.