गूळपोळी गावाला टँकर चालू करा : सूर्यकांत चिकणे
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी: गूळपोळी गावाला पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून टँकर सुरू करण्यात यावा अशी मागणी भैरवनाथ शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चिकणे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार शेख यांचेकडे केली आहे. गूळपोळी गावाला पाणीपुरवठा करणारी विहिर कोरडी पडली आहे.गूळपोळी गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे तरी गूळपोळी गावातील नागरिकांनी व भैरवनाथ शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चिकणे यांनी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून तात्काळ टँकर सुरू करण्यात यावा अशी मागणी केली आहे. गूळपोळी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर न चालू केल्यास लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भैरवनाथ शेतमजूर संघटना पाश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष सूर्यकांत चिकणे यांनी इशारा दिला आहे,सदर निवेदनावर सूर्यकांत चिकणे, तुकाराम चिकणे, सौ रेखा सूर्यकांत चिकणे, काका पाटील, गुलाब शेख,प्रशांत मचाले, यांच्या सह्य़ा आहेत.