महाराष्ट्र मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

बार्शीचे पत्रकार कदीर बागवान व जुबेर बागवान यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्र मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम सोलापूर येथील समाज कल्याण हॉल या ठिकाणी संपन्न झाला. समाजातील गुणवंत चा सत्काराची थाप त्यांच्या पाठीवर अशा संस्थेच्या वतीने करण्याच्या उद्देशाने व भावी काळात समाजातील गुणवंतांना त्यांच्या कार्यासाठी गती मिळण्यासाठी हे प्रयोजन केले असल्याची माहिती संयोजकांनी दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दीपक ट्रान्सपोर्ट सोलापूरचे संचालक साबीर मुस्ताक इनामदार होते.
कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सोलापूर शहर व जिल्हाध्यक्ष सुधीर खरटमल, एस आर फाउंडेशन संस्थापक साहिल रामपुरे, सोला पूर जिल्हा न्यायालय विधी सेवा प्राधिकरणचे मुख्यलोक अभिरक्षक संरक्षण सल्लागार एड. स्नेहल राऊत, सहाय्यक लोक अभिरक्षक संरक्षण सल्लागार एड. रेवण पाटील, प्रा. सिद्धार्थ जाधव, वाहतूक संघटना संयुक्त महासंघचे प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद, उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांचा संघटनेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्य स्तरीय पुरस्कार बार्शी येथील आदर्श पत्रकार म्हणून कदीर बागवान यांना गौरविण्यात आले. बार्शी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले जुबेर बागवान यांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच बार्शी येथील रफीक शेख, एजाज शेख, नवाज रमदान उद्योजक, रमजान तुटके यांना आदर्श समाज सेवक म्हणून गौरविण्यात आले. सर्वांना विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी मानव अधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दुर्योधन भडकुंबे, प्रदेश संघटक श्रीकांत कोळी, परदेश संपर्कप्रमुख महबूब कादरी, सोलापूर जिल्हा अध्यक्ष चांदसाहब मुजावर, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीनिवास वंगा, जिल्हा महासचिव परवेज मुल्ला, शहर उपाध्यक्ष अझर बिजापुरे, जुबेर तांबोळी, नागनाथ गणपा व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून अथक प्रयत्न केला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी कार्यक्रमाचा आभार व्यक्त केला.