उडान फाउंडेशन बार्शी आयोजित सलग दहाव्या वर्षाचे रक्तदान शिबिर संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : 26 जानेवारी 2024 रोजी बार्शीमध्ये उडान फाउंडेशन चे वतीने सालाबादप्रमाणे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यात 167 बॅगचे रक्त संकलन करण्यात आले विशेष बाब म्हणजे हे रक्तदान शिबिर मागील दहा वर्षापासून संपन्न होत आहे त्या सबंध बार्शीकरांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद भेटत आहे. दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत रक्तदान शिबिर यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह बार्शी येथे चालू होते. या रक्तदान शिबिरामध्ये महिलांनी हे सहभाग नोंदवला रक्तदानासाठी त्यांची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली होती.
उडान फाउंडेशन ही संघटना मागील बारा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्टपणे कार्य करत आहे, त्याचाच एक भाग रक्तदान शिबिर, गोरगरीब गरजूंना हॉस्पिटल व लग्नासाठी आर्थिक मदत, गरजूंना माफक दरात ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देत आहे, तसेच शैक्षणिक क्षेत्रात व सामाजिक विविध प्रश्नांवर काम करत असून त्याचा लाभ सबंध समाजाला होत आहे.
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते. भविष्यात रक्ताची मागणी वाढली तर रक्तांचा साठा कमी पडू नये, हीच गरज लक्षात घेऊन उडान फाउंडेशन बार्शी या सामाजिक संस्थेने दरवर्षीप्रमाणे प्रतिवर्षी ही शुक्रवार 26 जानेवारी 2024 ला महारक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते. विशेष म्हणजे या शिबिरात जमा होणाऱ्या रक्तसाठ्याचा काही भाग गरीब, गरजु रुग्णा च्या उपचारासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांकडून हा मदतीचा हात आहे. या रक्तदान शिबिरात 167 जणानी सहभाग घेऊन सर्व रक्तदात्याचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन आभार उडान फाउंडेशन च्या वतीने व्यक्त करण्यात आले. या शिबिराचे रक्तसंकलन भगवंत ब्लोड बँक यांनी केलेले आहे.तसेच या शिबिरास महिलांनीही सहभाग नोंदवून हम भी कुछ कम नहीं असा आदर्श निर्माण केलेला आहे. दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी , बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार राजाभाऊ राऊत, पत्रकार सचिनजी वायकुळे,डॉ.आरिफ शेख तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शिबिरास सदिच्छा भेट दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उड़ान फाउंडेशन चे सल्लागार शब्बीर वस्ताद ,युन्नूस शेख,आय्युब शेख,अध्यक्ष इरफान शेख,उपाध्यक्ष जाफर शेख,सचिव जमील खान,कार्याध्यक्ष शकील मुलानी,खजिंनदार शोयब काझी, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष वसीम पठाण,मोईन नाईकवाडी,शोयब सैय्यद तौसीफ बागवान, साजन शेख,अमजद शेख एजाज शेख मोहसीन पठाण, हाजी राजू शिकलकर, रॉनी सैय्यद, मुन्ना बागवान,अकिल मुजावर,वसीम मुलाणी,समीर शेख, सलीम चाचा चौधरी, इरफान(IB),रियाज़ शेख,अल्ताफ़ शेख,जमीर तंबोली, रियाज बागवान, सादिक काझी,मुज्जमिल जवलेकर इकबाल शेख जमीर शेख जावेद शेख रियाज बागवान रियाज़ शरीफ मोहसीन मलिक,सलमान बागवान,अझहर शेख,साहिल मुजावर,रहीम सय्यद,शाहरुख मुजावर,जुनेद शेख,यांनी अथक परीश्रम घेतले..
प्रिय रक्तदात्यांनो प्रजासत्ताक दिन निमित्त उडान फाउंडेशन, बार्शी, सलग 10 वे वर्ष अखंडित पणे आयोजित रक्तदान शिबिर मध्ये आवाहनास उस्फुर्त प्रतिसाद. रक्तदान केलेल्या सर्व 167 रक्तदात्यांचे उडान फाउंडेशन च्या वतीने तुमच्या सर्वांचे आभार मानतो. वास्तविक आभार पेक्षा देशाच्या आरोग्य व्यवस्थेत तुमचा रक्तदाता म्हणून सहभाग हा खूप मोलाचा भाग आहे .भारतीय या नात्याने रक्तदान करून खऱ्या अर्थी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात आनंद वाटला. सहकार्य केलेले सर्व सहकारी बांधवाचे ही आभार मानतो.