बांधकाम भवन या नुतन इमारतीचे पालकमंत्री रविंद्र चव्हान यांच्या हस्ते उद्घाटन
देशामध्ये राज्यातील बांधकाम विभाग आग्रस्थानी आहे : पालकमंत्री रविंद्र चव्हाण
B1न्यूज मराठी नेटवर्क
पालघर : देशातील विविध राज्यातील बांधकाम विभागापेक्षा महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग कामामध्ये आग्रस्थानी असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हान यांनी सांगितले.
बांधकाम भवन या नुतन इमारतीच्या तसेच रेल्वे फाटक क्र. 47 अ कोळगांव येथिल उड्डणपुलाचे लोकार्पण पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खाजदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, सुनिल भूसारा राजेश पाटील, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागतील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रेल्वेचे जाळे देशात मोठ्याप्रमाणात पसरले असून रेल्वे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रेल्वे फाटक बसविण्यात आले आहे. इतर वाहनांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी आावश्यक त्या ठिकाणी उड्डाण पुल बांधण्यात येते. कोळगांवातील उड्डाण पुलामुळे वाहतुकीची समस्या मिटणार आहे. देशामध्ये दिवसाच्या 36 की. मी. चा रस्ता तयार होतो. नविन रस्ते निर्माण करण्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक असते. स्थानिकांना विस्वासात घेऊन भूसंपादन करावे. विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्य शासन निधि कमि पडू देणार नाही. नागरीकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकल्प येत्या काळात पुर्ण करणार असल्याचा विश्वास पालकमंत्री रविंद्र चव्हान यांनी व्यक्त केला.