पारस येथील दुर्घटनेत जखमी झालेल्या रूग्णांची अंजलीताई आंबेडकर यांनी रूग्णालयात जावून केली विचारणा
B1न्यूज मराठी नेटवर्क
अकोला : आद. अंजलीताई आंबेडकर ह्या पारस येथील दुर्घटनेत जखमी झालेल्या रूग्णांची आज दि. १२ एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता सर्वोपचार अकोला येथे भेटून तब्येतीची विचारपूस केली तसेच सर्वोपचार रूग्णालयातील डॉ अभिजीत शिरसाट यांच्याशी रूग्णांच्या संदर्भात माहिती घेवून योग्य व चांगले उपचार करण्यात यावे अशी सुचना केली. ह्यावेळी आद. अंजलीताई आंबेडकर यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे, जि. प. अध्यक्ष सौ. संगीताताई अढावू, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, शिक्षण सभापती सौ मायाताई नाईक, जि. प. सदस्य आकाश शिरसाट, जि. प. सदस्य पुष्पाताई इंगळे, राम गव्हाणकर, रामकृष्ण सोनटक्के, शोभाताई शेळके, विकास सदांशिव, नितीन सपकाळ, पराग गवई, सुरेंद्र तेलगोटे, गजानन गवई, किशोर जामनिक, शरद इंगोले, प्रतिभा अवचार, कविता राठोड, मोहन तायडे, उज्वला गडलिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.