पारस येथील दुर्घटनास्थळाची पाहणी व जखमींची विचारपूस दुर्घटनाग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

अकोला : बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल जखमींची प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली.

पारस येथे भेट व पाहणी

दरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पारस येथे भेट देऊन काल (दि.9) रोजी घडलेल्या दुर्घटनाग्रस्त स्थळाची पाहणी केली. कृषी सहसंचालक किसन मुळे, कृषी विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी, तहसिलदार सैय्यद ऐसामुदीन आदींची त्यांच्या समवेत उपस्थिती होती. कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, बाबुजी महाराज संस्थानातील सभामंडपावर 100 वर्ष जुने झाड कोसळून घडलेली घटना दुदैवी आहे. या दुर्घटनेत सात व्यक्ती मयत झाले. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने पूर्ण उपचार करण्यात येतील. आवश्यकता भासल्यास खाजगी रुग्णालयातही उपचार करु.या दुर्घटनेतील बाधितांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे.अवकाळी पाऊस व वादळामुळे घरांचे मोठे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करावे. रात्री झालेल्या वादळात वीज पुरवठा विस्कळीत झाला असून तो पूर्ववत करावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जखमींची भेट

दरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दुर्घटनेतील जखमींची भेट घेण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट दिली. त्यांचे समवेत विधानसभा सदस्य आमदार रणधीर सावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.मुरली इंगळे आदी उपस्थित होते.कृषीमंत्र्यांनी उपचारार्थ दाखल जखमींची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांना सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या