राज्यात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न, अजित पवार यांचा गंभीर आरोप

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

संभाजी नगर : येथे झालेल्या दोन गती; वादावर आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केले आहे.

मी काल आवाहन केलं आहे की दंगल कोणी घडवून आणण्याच्या प्रयत्न करत असेल तर असं होऊ नये. जरी मी विरोधी पक्षात असलो तरी कुठल्या ही प्रकारचे वक्कतव्य होऊ देणार नाही की वातावरण बिघडेल. सगळ्यांनी शांतता प्रस्थापित करायला हवी. मी पुन्हा तमाम बांधवांना आवाहान करेने की कृपया माथी भडकून देण्याचे काम केलं तर त्याला कोणी ही बळी पडू नका, असे अजित पवार यांनी म्हटलेय.

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली दंगल सरकारपुरस्कृत असल्याचा मोठा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 2 एप्रिलला होणारी महाविकास आघाडीची सभा होऊ नये म्हणून कारस्थान रचल्याचा दावाही राऊतांनी केलाय. तर समाजात तेढ निर्माण करणं पाप असल्याची टीका उद्योगमंत्री उदय सामंतांनी केली आहे. बावनकुळेंनीही राऊतांचं वक्तव्य चिथावणी देण्यासारखं असल्याचं म्हटले आहे.

महाविकासआघाडीकडून संभाजीनगरात मोठी रॅली काढण्यात येणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर मांडणार असल्याची प्रतिक्रिया पटोलेंनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीनंतर मविआच्या सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. 2 एप्रिलला संभाजीनगरमध्ये मविआची सभा होणार आहे. मात्र ही सभा होणारच असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. तर ठरलेला कार्यक्रम झाला पाहिजे ,असं वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या