शांतता आणि शिस्तीत महाविकास आघाडीची सभा पार पडेल – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

प्रमुख पदाधिकारी यांनी घेतली मैदानावर बैठक

छत्रपती संभाजीनगर : २ एप्रिल रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. सर्वसामान्य नागरिक या सभेला मोठ्या संख्येने येणार असल्याचे पाहून सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे शहरात असंवेदनशील वातावरण निर्माण केले जाते. मात्र शिवसैनिक आणि नागरिक अफवाना बळी पडत नाही. शांतता आणि शिस्तीत महाविकास आघाडीची सभा पार पडेल, असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.
प्रशासन आणि प्रमुख पदाधिकारी यांनी सभा मैदानावर आढावा घेऊन नियोजन बैठक घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले की, सर्वांनी सतर्क राहून, अफवा आणि वातावरण खराब करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवावे. तात्काळ पोलीस आणि पदाधिकारी यांना माहिती द्यावी. सभा यशस्वी होणारच असा विश्वास त्यांनी वक्त केला. संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
या बैठकीस माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक,बाप्पा दळवी, गणू पांडे, अनिल पोलकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, महिला आघाडीच्या सहसंपर्क संघटक सुनीता देव, माजी महापौर जिल्हा समनव्यक कला ओझा, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपजिल्हासंघटक नलिनी बाहेती, अनिता मंत्री, जयश्री लुंगारे, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, शहर संघटक आशा दातर, भागूबाई शिरसाठ, विद्या अग्निहोत्री, शिव अंगणवाडी सेनेच्या मंजुषा नागरे, रेणुका जोशी, वनमाला पटेल झ किरण शर्मा, पद्मा तुपे, कविता सुरळे, सविता निघूळे, उपशहरप्रमुख अनिल जैस्वाल, किशोर कच्छवाह, राजू दानवे, दिग्विजय शेरखाने, संजय हरणे, शिवा लुंगारे, बाळासाहेब गडवे, संतोष खेडके, हिरा सलामपुरे, लक्ष्मीनारायण बाखरिया, सीताराम सुरे, बंटी जैस्वाल, छोटू घाडगे, नंदू लबडे, अभिजित पगारे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या