आरोग्य विभागाचा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

नागपूर : आरोग्य विभागातील 2021-22 या वर्षात विविध कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम करणा-यांचा सत्कार समारोह आज पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ताताई कोकडे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य समिती सदस्या निलीमाताई उके हया होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी केले.

आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारे राष्ट्रीय कार्यक्रम जसे कुटुंब कल्याण, क्षयरोग, कुष्ठरोग याविषयी सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रम कायाकल्प पुरस्कार याबाबत माहिती दिली. नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याकरिता प्रा. आ. केंद्रामध्ये १५ व्या वित्त आयोगातून जलशुध्दीकरण संयंत्र देण्यात येणार आहे. तसेच प्रा. आ. केंद्रात सोलर संयंत्र, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ई हेल्थ, आधार अॅट वर्थ, इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती दिली. यावेळी कायाकल्प कार्यक्रमांतर्गत प्रा.आ.केंद्र बेला व आरोग्य वर्धिनी केंद्र निलडोह यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला.


कुटुंबकल्याण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रथम पुरस्कार प्रा. आ. केंद्र नगरधन, द्वितीय प्रा. आ. केंद्र मांढळ व तृतीय पुरस्कार प्रा. आ. केंद्र गोंडखैरी यांना देण्यात आला. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सर्जन प्रथम पुरस्कार डॉ. आनंद गजभिये, द्वितीय डॉ. चोखांद्रे व तृतीय डॉ. चेतन नाईकवार यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट जिल्हास्तरीय आशा म्हणून प्रथम पुरस्कार श्रीमती सरिता सत्यवान खांडेकर प्रा.आ.केंद्र पाचगाव, द्वितीय पुरस्कार श्रीमती मंदा मधुकर ढोक प्राआ. केंद्र धापेवाडा व तृतीय पुरस्कार श्रीमती वनिता कैलास भोयर प्रा. आ. केंद्र नागरी उमरेड यांचा सत्कार करण्यात आला. क्षयरोग कार्यक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रथम पुरस्कार प्रा. आ. केंद्र चिरवा, द्वितीय प्रा. आ. केंद्र मोवाड व तृतीय पुरस्कार प्रा. आ. केंद्र सोमनाळा यांना देण्यात आला. कुष्ठरोग कार्यक्रमांतर्गत मारोती सभांजी ठाकरे व श्री. रामटेके उमरेड तालुका या कर्मचाऱ्यास सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच श्री. बन्सोड व श्री. येळे यांना प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले.
पुरुष नसबंदी कार्यक्रमात योगदान दिल्याबद्दल आरोग्य कर्मचारी सुधीर खांडेकर प्रा. आ. केंद्र भुगाव यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करतांना जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.मुक्ताताई कोकडे यांनी ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचे अभिनंदन केले व ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांनी जिद्दीने काम करुन भविष्यात पुरस्कार मिळेल असे कार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी मंचावर डॉ. हर्षा मेश्राम अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. रेवती साबळे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, डॉ. दिपिका साकोरे वैद्यकिय अधिकारी कुष्ठरोग, डॉ. विद्यानंद गायकवाड जिल्हा क्षयरोग अधिकारी हे उपस्थित होते. यावेळी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकिय अधिकारी, आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरेश मोटे यांनी केले. आभार प्रदर्शन वैशाली वानखेडे सार्वजनिक आरोग्य परिचारिका यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता निलेश बुटे विस्तार अधिकारी आरोग्य, मयुरी साळवे आशा कोऑर्डिनेटर, डॉ.मिथुन खेरडे जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक, डॉ. प्रियंका मेश्राम आरोग्यवर्धीनी सल्लागार यांनी परिश्रम घेतले.



About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या