जिल्ह्यात महिला उद्योजिका तयार होत आहेत ही आनंदाची बाब खा.भावनाताई गवळी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

माविमच्या वस्तू विक्री प्रदर्शनाला भेट

वाशिम : महिला आर्थिक विकास महामंडळाने जिल्हयात ४ हजार महीला बचत गटांची स्थापना केली आहे. महिलांना सक्षम करण्याकरिता बँकांनी आजपर्यंत १८१ कोटी रुपये अर्थसहाय्य केले आहे.त्यामुळेच माविमच्या बचतगटातील महिला ह्या व्यवसाय सुरू करून यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत.ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. असे गौरवपुर्ण उदगार खासदार भावनाताई गवळी यांनी काढले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने विठ्ठलवाडी, वाशिम येथे आयोजित नवतेजस्विनी जिल्हास्तरीय वस्तू विक्री व प्रदर्शनाला रविवारी त्यांनी भेट दिली.यावेळी त्या बोलत होत्या. माविम नेहमी महिलांच्या विकासात विशेष कामगिरी करीत असुन नवं तेजस्विनी प्रदर्शन व विक्रीमुळे जिल्हयातील बचत गटातील महिलांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचे सांगून
माविमच्या या कार्यास खासदार श्रीमती गवळी यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माविमचे विभागीय सनियंत्रण अधिकारी केशव पवार, जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे,सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख,कार्यक्रम अधिकारी प्रांजली वसाके,गजु हतोलाकर, राहुल मोकळे, आनंद काळे, गौरव नंदनवार, व्यवस्थापक विजय वाहने,वर्षा डाखोरे, अर्चना कोकणे, प्रीती सावके, अमृता पवार, कार्तिक तायडे, प्रशांत गोळे, जोत्सना ठाकरे, प्रदीप तायडे, अभिषेक माळेकर, नीती वाघमारे, स्वाती गवळी, साधना शेजुळ, सविता सुतार, संगीता शेळके, प्रदीप देवकर, सागर विभुते, तेलगोटे, पट्टेबहादूर, संतोष मुखमाले, सीमा पाचपिल्ले, नंदकिशोर राठोड, नसीम मांजरे, सुनिता मनवर, उषा ठाकरे, नंदा बयस, गीता आमटे, विनय पडघान, जोत्सना पुरी, मिरा वाघमारे,वर्षा अंभोरे, प्रीती खडसे, प्रणिता भगत, प्रमोद गोरे, अरुण सुर्वे, खंडारे, शरद कांबळे, भारती चक्रनार, सुनिता सुर्वे ,अविनाश इंगळे, संघरत्न खिराडे उपस्थित होते. तसेच प्रदर्शनामध्ये सहभागी असणाऱ्या बचत गटातील महिला, प्रेक्षक,खरेदीदार यांची देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या