पिझोमीटरच्या सहाय्याने जिल्ह्यातील 95 गावांतील पाणी पातळी मोजणार , अटल भूजल योजनेअंतर्गत 95 ग्रामपंचायतीत प्रयोग
B1न्यूज मराठी नेटवर्क
सांगली : केंद्र सरकारच्या अटल भूजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील 95 गावांमध्ये पिझोमीटर आणि पर्जन्यमापक बसविण्यात येणार आहे. यामुळे या गावात पाण्याचा किती उपसा झाला आहे, भूजल पातळी किती आहे, हे ग्रामस्थांना कळणार आहे, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सांगली चे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी दिली. केंद्र सरकार जागतिक बँकेच्या मदतीने अटल भूजल योजना 2025 पर्यंत राबविणार आहे. या योजनेत सांगली जिल्ह्यातील 95 गावांचा समावेश करण्यात आला आहे. दर तीन महिन्याला भूजल संरक्षण विभागाला भूजल पातळी मोजावी लागते. त्यासाठी काही विहिरींची निवड करून संबंधित अधिकारी व कर्मचारी भूजल पातळी मोजतात. यासाठी जास्त कालावधी लागतो. शिवाय, तीन महिन्याला भूजल पातळी समजते. यावर उपाय म्हणून अटल भूजल योजनेतून पिझोमीटर यंत्राद्वारे दररोज त्या गावातील भूगर्भात किती पाणी आहे आणि त्याचा किती उपसा झाला, याची माहिती मिळणार आहे. हे पिझोमिटर म्हणजे एक विंधन विहीर असून त्यावरती स्वयंचलित मशीन बसवून पाण्याची पातळी मोजण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायती अंतर्गत पिझोमीटरची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी 94 विंधण विहिरींचे खोदकाम पुर्ण झाले असून, विंधण विहिरीं भोवती जाळी लावण्याचे काम सुरू आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव, अलकुड (एस), अलकुड (एम), आरेवाडी, बनेवाडी, बसप्पाचीवाडी, बोरगाव, देशिंग, ढालेवाडी, अग्रणधुळगाव, गर्जेवाडी, हरोली, हिंगणगाव, इरळी, जाधववाडी, जाखापूर, जायगव्हाण, करलहटटी, केरेवाडी, खरशिंग, कोगनोळी, कोकळे, कुची, कुकटोळी, कुंडलापुर, नरसिंहगाव, लंगरपेठ, लोणारवाडी, मळणगाव, म्हैशाळ (एम), मोघमवाडी, मोरगाव, नांगोळे, पिंपळवाडी, रांजणी, रामपुरवाडी, सराटी, शेळकेवाडी, शिरढोण, शिंदेवाडी (एच), थबडेवाडी, विठुरायाचीवाडी, झुरेवाडी, करोली (टी), खानापूर तालुक्यातील बलवडी खा., धोंडेवाडी, गोरेवाडी, हिवरे, करंजे, मोही, रामनगर, पळशी, पोसेवाडी, शेडगेवाडी, सुलतानगादे, बेणापूर, खानापूर नगरपंचायत, तासगाव तालुक्यातील अंजनी, बिरणवाडी, दहिवडी, डोंगरसोनी, गव्हाण, जरंडी, लोकरेवाडी, नागेवाडी, सावळज, सिध्देवाडी, वज्रचौंडे, वडगाव, वायफळे, यमगरवाडी, जत तालुक्यातील अंकले, बाज, बसर्गी, बेळूंखी, बिळूर, डफळापूर, डोर्ली, एकुंडी, गुगवाड, जिरग्याळ, खलाटी, खिलारवाडी, खोजानवाडी, कुडणूर, साळमाळगेवाडी, सिंदूर, शिंगणापूर, वज्रवाड, उमराणी, मिरवाड, येळदरी, मिरज तालुक्यातील चाबुकस्वारवाडी, सलगरे या गावांमध्ये पिझोमीटर बसविण्यात येणार असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सांगली चे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.