पाण्याचा काटकसरीने उपयोग करावा – जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन

बुलडाणा : आगामी काळातील पाणीटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने उपयोग करावा. प्रत्येक नागरिकाने पाण्याच्या बचतीसाठी खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, डॉ. ह. पि. तुम्मोड केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज, दि. 16 मार्च रोजी जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनिल चौधरी, कार्यकारी अभियंता प्रशांत संत उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक चौधरी यांनी जिल्ह्यात एप्रिल ते जुन या कालावधीत निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जनतेचा सक्रीय सहभाग आणि सहकार्य आवश्यक आहे. याशिवाय पाण्याचा प्रश्न मिटणार नाही. जिल्ह्यात 10 ते 15 दिवसआड पिण्याचे पाणी उपलब्ध होते. गत काळात महसूल आणि जलसंपदा विभागाने राबवलेल्या गाळ उपसाचे महत्व महत्व सांगून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजनाची माहिती दिली. संत यांनी पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी स्वत:मध्ये बदल करून परिवर्तन केल्यास पाणीबचतीचे महत्व जनतेला पटवून देता येईल. संकटावर आपण कशाप्रकारे प्रतिक्रिया देतो, याचे महत्व सांगितले. पाण्याच्या बचतीवर प्रत्येक व्यक्तीने स्वत:ची भूमिका ठरविण्याचे आवाहन केले.सुरवातीला जिल्ह्यातील खडकपूर्णा, पैनगंगा, वान, मन, नळगंगा, पुर्णा, ज्ञानगंगा, विश्वगंगा नद्यांच्या पाण्याचे पुजन करण्यात आले. उपस्थितांनी जलप्रतिज्ञेचे वाचन करुन पाणी बचतीचे महत्व जनतेस पटवुन देण्याचे आवाहन करण्यात आले. जलजागृती सप्ताहात पाणीबचतीविषयी जनजागृती, वाहनांवर पोस्टर लावणे, पाणी बचती विषयी मान्यवर वक्त्यांचे प्रबोधनपर सेमिनार, मान्यवरांच्या पाणीबचत, पाणी वापर संस्था व कालवा स्वच्छता आदी विषयावर यशोगाथा आयोजित करणे. समाजमाध्यमांवर पाणीबचत विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. चंद्रकांत साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी राजेंद्र गाडेकर रामकृष्ण पाटील, कार्यकारी अभियंता एस. एस. सोळंके, उपकार्यकारी अभियंता क्षितीजा गायकवाड, सहायक अधिक्षक अभियंता तुषार मेतकर, उपअभियंता श्री. कनोज, एस. पी. पाटील, एस. पी. जाधव, वि. रा. चोपडे, अधिक्षक देविदास वाकोडे, कनिष्ठ अभियंता श्वेता झावरे, करण उमाळे, केशव जवादे, जानकीराम आव्हाडे, अशोक चव्हाण, ल. रा. तायडे, शत्रुघ्न धोरण, शेख ग्यासुद्दीन, गजानन लोखंडे पुढाकार घेतला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या