बार्शीसत्कारसामाजिक

महिलांनी स्वतःच्या कर्तुत्वावर उद्योजिका म्हणून नाव कमावले पाहिजे – शिवाजी पवार

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : गाव पातळीवरील प्रत्येक महिलेमध्ये उद्योजिका होण्यासाठी जन्मजात वेगवेगळी गुण असतात त्याला थोडंसं आकार दिला किती यशस्वी उद्योजिका होऊ शकते आणि स्वतःच्या कर्तुत्वावर खूप मोठा पल्ला गाठू शकतो असं आजपर्यंत आपण पाहिलेला आहे त्यामुळे आपणही यशस्वी होऊ शकता आणि उद्योजिका म्हणून पुढे येऊ शकता असं प्रतिपादन यशदा राज्य प्रशिक्षक शिवाजी पवार यांनी व्यक्त केले. ते गाताची वाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या उद्योजक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ कुसुम राजेंद्र वेताळे आणि गहिनीनाथ गात , तिडके हे उपस्थित होते.पवार बोलताना पुढे म्हणाले की राज्य शासनाच्या वतीने यावर्षी मिलेट वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये पिकणारी नाचणी ज्वारी बाजरी रागी इत्यादी गोष्टीवर प्रक्रिया करून आपण उत्तम पद्धतीचा माल तयार करून जगाच्या बाजारपेठेत विकू शकतो. मात्र त्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं पाहिजे यामध्ये पॅकिंग मार्केटिंग ब्रॅण्डिंग इत्यादी विषयाचा ज्ञान घेऊन महिलांनी आता नोकरी मागण्यापेक्षा रोजगार देणार झालं पाहिजे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं यावेळी मराठी माणूस उद्योगांमध्ये येताना दिसतो ही आनंदाची बाब आहे महिला शेतकरी प्रक्रिया उद्योगांमध्ये जर आले तर खूप चांगले यश मिळू शकतात असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला यावेळी अजिंक्य भांगे राजेंद्र वेताळे सौ राणी गात इत्यादी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महिलांची आरोग्य तपासणी करून आहार आणि औषध इत्यादीची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे आभार सामाजिक कार्यकर्ते गहिनीनाथ गात यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button