धाराशिवप्रशासनमहाराष्ट्र

जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल,पुरवठ्यास सुरुवात

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

धाराशिव : सद्यस्थितीत भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने दि.१२ मार्च २०२६ रोजीच्या आदेशान्वये राज्यासाठी ३७४४ किलो लिटर केरोसिन नियतन मंजूर केले आहे.त्यानुषंगाने राज्य शासनाकडून धाराशिव जिल्ह्यासाठी ८४ किलो लिटर केरोसिन नियतन मंजूर करण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ८४ हजार लिटर केरोसिनचे तालुकानिहाय वाटप अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभ योजना शिधापत्रिकाधारकांसाठी सर्वसाधारण प्रमाणात निश्चित करण्यात आले आहे.त्यानुसार धाराशिव तालुक्यास २० हजार लिटर, तुळजापूरला ११ हजार लिटर, लोहारा ७ हजार लिटर, उमरगा १३ हजार लिटर,परंडा ९ हजार लिटर,भूम ८ हजार लिटर, कळंब ११ हजार लिटर आणि वाशी तालुक्यास ५ हजार लिटर केरोसिनचे नियतन देण्यात आले आहे.5000दरम्यान,मंजूर करण्यात आलेल्या ८४ हजार लिटरपैकी १२ हजार लिटरचा पहिला टँकर आज १३ मे रोजी जिल्ह्यात दाखल झाला असून, धाराशिव तालुक्यापासून केरोसिन पुरवठ्यास सुरुवात करण्यात येणार आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती.स्वाती शेंडे यांनी केरोसिन टँकरला जिल्हाधिकारी कार्यालय येथे हिरवा झेंडा दाखवून जिल्ह्यातील केरोसिन वाटपाचा शुभारंभ केला.5000जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना हे केरोसिन प्रति लिटर ६३ रुपये दराने उपलब्ध होणार असून,प्रति कार्ड ३ लिटरप्रमाणे वितरण करण्यात येणार आहे.हे नियतन प्राधान्याने अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना आणि त्यानंतर प्राधान्य कुटुंब लाभ योजना शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
धाराशिव तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांनी आपल्या केरोसिन किंवा रास्तभाव दुकानदारांकडे जाऊन केरोसिन खरेदी करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button