बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कै.मा.आ. चंद्रकांत (नाना) दत्ताजीराव नाईक निंबाळकर उपबाजार समिती, वैराग येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वैराग येथील कै. मा. आ. चंद्रकांत (नाना) दत्ताजीराव नाईक निंबाळकर उपबाजार समिती येथे सभापती रणवीर राऊत यांच्या शुभहस्ते १ कोटी ३५ लाख ८८ हजार रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या जनावर मार्केट साठी निवारा शेडचे,१८ लाख ४५ हजार रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या हमाल भवनचे,९ लाख ९७ हजार रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सेल हॉल(सौदे हॉल)चे लोकार्पण व हिंगणी रोड लगत व्यापारी गाळे बांधकाम करणे यासाठी ३१ लाख ५२ हजार रुपये,वैराग उपबाजार समिती आवारातील प्लॅट क्र.३ येथे आडत गाळे बांधकाम करणे यासाठी ६३ लाख १८ हजार रुपये मंजूर कामांचे भूमिपूजन करण्यात आले. भविष्यात देखील शेतकरी हमाल मापाडी तसेच व्यापारी बांधवांच्या हितासाठी विविध विकास कामे करण्याचा मानस यावेळी सभापती रणवीर राऊत यांनी उपस्थित सर्वांच्या समोर व्यक्त केला. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सभापती रणवीर राऊत यांच्यासह सर्व संचालक यांच्या नेतृत्वात बाजार समितीत लोकाभिमुख व शेतकरी हिताचे उपक्रम व विकास कामे होत असून सोलापूर जिल्ह्यात बाजार समिती अत्यंत उल्लेखनीय काम करीत आहे असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष दादा निंबाळकर,पंचायत समितीचे माजी सभापती अनिल डिसले,माजी नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी, रमेश (आण्णा) पाटील, बार्शी मर्चंट असोसिएशन अध्यक्ष बाबासाहेब कथले, उपाध्यक्ष दिलीप शेठ गांधी,ज्येष्ठ नेते कुंडलिक भाऊ गायकवाड,उपसभापती झुंबर जाधव,वैराग मर्चंट असोसिएशन अध्यक्ष शांताराम काशीद, उपाध्यक्ष राजाभाऊ गावसाने, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मदन दराडे सर,कपिल कोरके,सुधीर बारबोले, कौरव माने,अनिल पाटील,संजय डुरे-पाटील, बाबासाहेब मोरे,संजय पाटील,लक्ष्मण संकपाळ, प्रमोद वाघमोडे, डॉ.भारत पंखे, केशव घोगरे, विलास (आप्पा) रेणके, बाबासाहेब गायकवाड प्रशांत कथले मालक, शाहूराजे निंबाळकर, गोरख जगताप, दिगंबर भोसले, नागनाथ नवले, नवनाथ जाधव,वैरागचे नगरसेवक वैजीनाथ आदमाने,सचिव तुकाराम जगदाळे, सर्व संचालक मंडळ तसेच वैराग व वैराग परिसरातील शेतकरी बांधव, व्यापारी, हमाल, तोलार, इतर प्रमुख मान्यवर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.