ठाणे जिल्ह्यातील दीडशे विद्यार्थ्यांना ‘महाज्योती’ मार्फत मिळाले टॅबलेट व सिमकार्ड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

ठाणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे (महाज्योती) मार्फत जेईई/निट/एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्ह्यातील 153 विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमकार्ड वाटप करण्यात आले. इतर मागासवर्ग, व्हीजेएनटी व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीच्या वतीने टॅबलेट व सीमाकार्ड वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 235 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार असून त्यातील 153 विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात टॅबचे वाटप करण्यात आले. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे, प्र. जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार ब. वाघमारे आदि उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन उच्च शिक्षणात भरारी घेण्याचे व पालकांचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन केले. ज्ञानाचे अमृतकण शोधण्यासाठी तुम्हाला या टॅबची मदत होणार असून याचा वापर करून जगाशी जोडले जाता येईल. मात्र, त्याचा वापर हा आपल्या ज्ञानवर्धनासाठी करण्यात यावे. इंटरनेटच्या युगात उपलब्ध असलेल्या माहितीच्या महाजालाचा उपयोग आपल्या ज्ञानात, कौशल्य विकासात करण्याचा सल्ला जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी दिला.सहाय्यक आयुक्त इंगळे यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी विद्यार्थी व त्यांचे पालक यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत शासनाच्या या योजनेतून विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड दिल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालय अधीक्षक वर्षा बिलये यांनी केले. यावेळी समाज कल्याण निरीक्षक अभिजित शिंदे, यांच्यासह समाज कल्याण विभागाचे कर्मचारी तसेच विद्यार्थी व त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या