पुनर्विवाहावर भाष्य करणारा ‘स्पर्श’ हा आजपासून चित्रपटगृहात : दिग्दर्शक माने
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग प्रतिनिधी : गौतम नागटिळक
वैराग : विधवा तरूणीच्या पुनर्विवाहावर भाष्य करणारा स्पर्श हा मराठी चित्रपट 24 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिग्दर्शित आणि शिवानी फिल्मस निर्मित’ दत्ता माने यांनी दिली. हा मराठी चित्रपट विधवा तरुणीने पुनर्विवाह केल्यानंतर कोणत्या सामाजिक परिस्थितीला समोर जाऊन सामाजिक स्थिती बदलण्याचं धाडस या चित्रपटांमधील नायक व नायिका करत असते. भाकरीसाठी आलाच की, माझ्यासाठी आला हा संवाद प्रेक्षकांच्या अंगावर शाहरे निर्माण करणारा आहे. समाजामधील प्रत्येक व्यक्तीने हा चित्रपट बघणे गरजेचे आहे.