मधुबन ट्रॅक्टर्स येथे जॉन डियर TREM-IV टेक्नॉलॉजीच्या ट्रॅक्टरचे अनावरण व ग्राहक मेळावा संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

उस्मानाबाद : मधुबन ट्रॅक्टर्स यांच्या उस्मानाबाद येथील शाखेत जॉन डियर कंपनीच्या TREM-IV या टेक्नॉलॉजी ने परिपूर्ण असलेल्या 5405 या 63 HP ट्रॅक्टर चे अनावरण जॉन डियर कंपनीचे अधिकारी व ग्राहकांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमास जॉन डियर इंडिया प्रा.लि. चे झोनल मॅनेजर श्री राजेश लिंगमपल्ली तसेच महाराष्ट्र एरिया मॅनेजर अंकित सक्सेना, रिजनल कस्टमर सपोर्ट मॅनेजर अर्जुन सिंग, असिस्टंट एरिया मॅनेजर कैलास तासकर, टेरिटरी कस्टमर सपोर्ट मॅनेजर राजेश पाटील, मधुबन ट्रॅक्टर्स चे चेअरमन प्रवीण कसपटे, प्रमुख व्यवस्थापक माणिक हजारे इ. उपस्थित होते.अंकित सक्सेना यांनी जॉन डियर कंपनी बद्दल ग्राहकांना मार्गदर्शन केले व जॉन डीअर कशाप्रकारे नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणत आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिली. राजेश लिंगमपल्ली यांनी कंपनी कशाप्रकारे देशभरामध्ये उत्तम सर्विस आणि क्वालिटी देत आहे याबद्दल माहिती दिली तसेच जॉन डियर च्या नवनवीन उपकरणांचा वापर करून शेतीतील उत्पन्न कशा पद्धतीने वाढविता येईल याबद्दल देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. राजेश पाटील यांनी 5405 या ट्रॅक्टर मधील नाविन्यपूर्ण बदल दाखविणारे प्रेझेंटेशन सादर केले. कैलास तासकर यांनी जॉन डियर कंपनीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वेगवेगळ्या उपक्रम व योजनांची माहिती दिली तसेच मधुबन ट्रॅक्टर्स नेहमीच विक्री व सेवा दोन्ही मध्ये आघाडीवर असल्याचे मत व्यक्त केले. प्रवीण कसपटे यांनी मधुबन ट्रॅक्टर्स ला मिळालेल्या भरघोस यशाचे मानकरी हे जॉन डीअर चे सर्व ग्राहक तसेच मधुबन ट्रॅक्टरची संपूर्ण टीम असल्याचे मत व्यक्त केले. माणिक हजारे यांनी मधुबन ट्रॅक्टरच्या सर्व शाखा आणि त्यांच्या कामकाजांबद्दल माहिती दिली तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी लवकरच अन्य नवीन शाखा सुरू करणार असल्याचे सांगितले. यावेळी जॉन डीअर चे समाधानी ग्राहक निरजानंद अंबर व समाधान मेंढेकर यांनी आपले जॉन डीअर ट्रॅक्टर बद्दलचे अनुभव सर्वांना सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवीन आठ ग्राहकांना जॉन डियर ट्रॅक्टरची चावी मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमास उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा तसेच कळंब तालुक्यातील शेतकरी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक हजारे यांनी केले. सूत्रसंचालन नरेश ठाकूर यांनी केले तर आभार कैलास तासकर यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या