‘NAAC’साठी उद्याची नव्हे, आजचीच तयारी करा : डॉ. व्ही. ए. साळुंखे

0

बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये ‘NAAC : Current Process and Future Directions’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या वतीने महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘NAAC : Current Process and Future Directions’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या डिजिटल ऑडिटोरियममध्ये झालेल्या या कार्यशाळेत चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगलीचे IQAC समन्वयक डॉ. व्ही. ए. साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.

NAAC मूल्यांकन प्रक्रियेतील सध्याची कार्यपद्धती, भविष्यातील संभाव्य बदल व मूल्यांकन प्रक्रियेच्या दिशेबाबत डॉ. साळुंखे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सध्या असलेल्या सात निकषांच्या अनुषंगाने महाविद्यालयातील विविध उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी आणि त्याचे परिणाम यांचे योग्य दस्तऐवजीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात NAAC मूल्यांकनाच्या होणाऱ्या संभाव्य बदलाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांनी आतापासूनच गुणवत्ता प्रक्रियेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

“NAAC ची समिती उदया महाविद्यालयात आली, तरी आपण आजच पूर्णपणे तयार असले पाहिजे,” हा डॉ. साळुंखे यांचा संदेश कार्यशाळेचा विशेष ठरला. महाविद्यालयात आयोजित होणारा प्रत्येक कार्यक्रम हा केवळ एक उपक्रम न राहता त्याचे नियोजन, उपस्थिती, छायाचित्रे, अहवाल, निष्पत्ती, विद्यार्थ्यांना झालेला लाभ आणि संबंधित कागदपत्रे व्यवस्थित जतन केली पाहिजेत. कार्यक्रम झाल्यानंतर त्याचा अहवाल तातडीने IQAC कडे सादर केल्यास भविष्यातील NAAC मूल्यांकनासाठी आवश्यक पुरावे सहज उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

यामुळे उपस्थितानां ‘कार्यक्रम घेणे’ आणि ‘कार्यक्रमाचे गुणवत्तापूर्ण दस्तऐवजीकरण करणे’ यातील फरक स्पष्ट झाला. आपल्या विभागात वर्षभर राबविलेल्या उपक्रमांची माहिती व्यवस्थित नोंदवून ठेवणे, त्यातून विद्यार्थ्यांना झालेला शैक्षणिक व कौशल्यात्मक फायदा अधोरेखित करणे आणि त्या कामाचा संस्थेच्या गुणवत्तावाढीशी संबंध जोडणे, याबाबत कार्यशाळेत व्यावहारिक मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे भविष्यातील NAAC प्रक्रियेकडे पाहण्याची दृष्टी अधिक स्पष्ट होण्यास या कार्यशाळेची मदत झाली.500कार्यशाळेच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) ए. बी. कदम यांनी NAAC मूल्यांकनासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. महाविद्यालयातील प्रत्येक विभागाने राबविलेल्या उपक्रमांची माहिती, डेटा, अहवाल व आवश्यक कागदपत्रांचे शिस्तबद्ध पद्धतीने संकलन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

“प्रत्येक विभागाचे काम हे महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा एक महत्त्वाचा भाग आहे,” या भावनेतून सर्वांनी आपले योगदान देत राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. कदम यांनी केले.

महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्तमरीत्या काम करीत असून, गुणवत्ता वृद्धीच्या प्रत्येक उपक्रमात प्रशासन त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात IQAC समन्वयक डॉ. बी. डी. लांडे यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला.

NAAC मूल्यांकनाच्या पुढील टप्प्यांमध्ये येणाऱ्या संभाव्य अडचणींची पूर्वतयारी आत्तापासून करता यावी, प्रत्येक विभागाला आपली जबाबदारी स्पष्ट व्हावी आणि महाविद्यालयातील गुणवत्ताविषयक कामकाज अधिक परिणामकारक व दस्त ऐवजीकरणाधारित व्हावे, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सदर कार्यशाळेला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यशाळेच्या माध्यमातून शिक्षकांना NAAC मूल्यांकनाची प्रक्रिया समजून घेण्याबरोबरच दैनंदिन शैक्षणिक व सहशैक्षणिक कामाचे नियोजन, पुराव्यांसह नोंद, अहवाल लेखन आणि गुणवत्तेच्या दृष्टीने त्याचे महत्त्व समजले. त्यामुळे भविष्यातील NAAC मूल्यांकनासाठी स्वतंत्रपणे शेवटच्या क्षणी तयारी करण्याऐवजी दररोजच्या कामातूनच गुणवत्ता आणि दस्त ऐवजीकरणाची प्रक्रिया विकसित करण्याची प्रेरणा या कार्यशाळेतून मिळाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. एम. माळी यांनी केले, तर आर. एस. डिसले यांनी आभार मानले. उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या या कार्यशाळेमुळे बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजच्या गुणवत्तावाढीच्या आणि NAAC सज्जतेच्या प्रयत्नांना निश्चितच नवी दिशा मिळाली.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या