शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ; शासन भक्कमपणे पाठीशी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून खेड येथे पीक नुकसानीची पाहणी

0

शेतातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद

B1न्यूज मराठी नेटवर्क

धाराशिव : पावसाच्या दीर्घ खंडामुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. राज्य शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. पीक नुकसानीबाबत शासन सकारात्मक असून येत्या काही दिवसांत मदतीसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिली.

पालकमंत्री सरनाईक यांनी आज, १७ सप्टेंबर रोजी धाराशिव तालुक्यातील खेड येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन पावसाच्या दीर्घ खंडामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार मृणाल जाधव तसेच संबंधित विभागांचे गावपातळीवरील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री सरनाईक यांनी खेड येथील शेतकरी ज्ञानेश्वर टकले यांच्या शेताला भेट देऊन नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्यांनी टकले यांच्याशी थेट संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली. जवळपास शंभर टक्के सोयाबीन पीक हातचे गेल्याची व्यथा टकले यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली. एवढ्या मोठ्या नुकसानीतून सावरण्यासाठी शासनाने पीक नुकसानीपोटी भरीव आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.500शेतातूनच उपमुख्यमंत्र्यांना दाखविले नुकसान पीक नुकसानीचे गांभीर्य प्रत्यक्ष लक्षात आणून देण्यासाठी पालकमंत्री सरनाईक यांनी शेतातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यांनी नुकसानग्रस्त शेतातील सोयाबीन पीक उपमुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष दाखविले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर टकले यांच्याशी संवाद साधून त्यांच्या पिकाच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. राज्य शासन संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशीही संवाद साधून जिल्ह्यातील पीक नुकसानीची माहिती घेतली. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत करावी, अशी मागणी खासदार राजेनिंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याशी संवाद साधत जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. पालकमंत्री सरनाईक यांनीही जिल्ह्यातील सोयाबीनसह अन्य पिकांच्या नुकसानीची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिली.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री सरनाईक म्हणाले, शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. येत्या काही दिवसांत मदतीबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. सोयाबीनसह अन्य पिकांचेही नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन निश्चितपणे मदत करेल. या शब्दांत त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिलासा दिला.

यानंतर पालकमंत्री सरनाईक यांनी खेड येथील ऊस उत्पादक शेतकरी वासुदेव मेटे यांच्या शेतालाही भेट दिली. त्यांच्या नुकसान झालेल्या ऊस पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची माहिती घेतली. यावेळी खेड येथील अनेक शेतकरी बांधवांनी पालकमंत्र्यांची भेट घेत पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन, ऊस आणि अन्य पिकांचे झालेले नुकसान त्यांच्या निदर्शनास आणून दिले. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी आणि अपेक्षा पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. पालकमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे जाणून घेत शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चार केला.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या